Join us

डिहायड्रेशन झालं कसं कळेल? अनुष्का शर्माच्या डायटिशिअननं सांगितल्या ३ सोप्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:04 IST

How To Check Dehydrated: शरीरात इलेक्ट्रोलाइट डिसबॅलन्स आणि एनर्जीची कमतरता जाणवते. शरीरात पाणी कमी झाल्यावर वेगवेगळ्या समस्या होतात. यानं हार्ट, किडनी आणि ब्रेनचं नुकसान होतं.

How To Check Dehydrated: डिहायड्रेशन झालं की, शरीर अनेक संकेत देतं. शरीरात पाणी कमी झालं की, डिहायड्रेशनची स्थिती निर्माण होते. डिहायड्रेशन तेव्हा होतं जेव्हा शरीरातून निघणारं पाणी शरीरात जाणाऱ्या पाण्यापेक्षा कमी होतं. जास्तीत जास्त लोक डिहायड्रेशनच्या समस्येकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. यानं शरीरात इलेक्ट्रोलाइट डिसबॅलन्स आणि एनर्जीची कमतरता जाणवते. शरीरात पाणी कमी झाल्यावर वेगवेगळ्या समस्या होतात. यानं हार्ट, किडनी आणि ब्रेनचं नुकसान होतं.

डिहायड्रेशन झालं कसं चेक कराल?

अभिनेत्री अनुष्का शर्माची डायटिशिअन आणि ऑलम्पिक न्यूट्रिशनिस्ट रयान फर्नांडिसनं इन्स्टाग्रामवर डिहायड्रेशन आणि ते कसं ओळखावं याबाबत सांगितलं. त्यानी डिहायड्रेशन ओळखण्याच्या तीन स्टेप सांगितल्या. रयाननं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "तुम्हाला सतत थकल्यासारखं जाणवतं का? त्वचे सैल झाली आहे? तुमचा मूड खराब आहे का? याचं कारण डिहायड्रेशन असू शकतं. हे ओळखण्यासाठी ३ टिप्स वापरू शकता'.

स्किन पिंच टेस्ट 

तुमच्या हातावर पिंच म्हणजेच चिमटा काढा आणि त्यानंतर त्वचा जर हळूहळू आपल्या जागेवर परत जात असेल, तर याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला डिहायड्रेशन झालं आहे.

जिभेची टेस्ट

आरशात तुमची जीभ बघा. जर तुमची जीभ कोरडी असेल किंवा त्यावर पांढरा थर जमा झाला असेल तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही पाणी कमी पित आहात.

घाम आणि लघवीचा रंग

जर तुम्हाला घाम कमी येत असेल आणि उन्हाळ्यात लघवीचा रंग गर्द पिवळा झाला असेल तर हे डिहायड्रेशनचं लक्षण असू शकतं.

रयान फर्नांडिसनं सांगितलं की, जर यातील कोणतंही लक्षण तुम्हाला जाणवत असेल तर रोज कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यावं. तसेच पाणी असलेले फळंही खावेत.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य