Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लिव्हर आतून साफ करण्याचे 3 सोपे उपाय, खर्चही कमी; फॅटी लिव्हर-फेलिअरचा टळेल धोका!

लिव्हर आतून साफ करण्याचे 3 सोपे उपाय, खर्चही कमी; फॅटी लिव्हर-फेलिअरचा टळेल धोका!

Liver Detox Tips : डायटिशिअन श्वेता शहा पांचाळ यांनी लिव्हर साफ करण्याचे 3 नॅचरल उपाय सांगितले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 11:33 IST2025-08-20T11:29:12+5:302025-08-20T11:33:37+5:30

Liver Detox Tips : डायटिशिअन श्वेता शहा पांचाळ यांनी लिव्हर साफ करण्याचे 3 नॅचरल उपाय सांगितले आहेत.

Diet expert tells 3 natural way to liver detox | लिव्हर आतून साफ करण्याचे 3 सोपे उपाय, खर्चही कमी; फॅटी लिव्हर-फेलिअरचा टळेल धोका!

लिव्हर आतून साफ करण्याचे 3 सोपे उपाय, खर्चही कमी; फॅटी लिव्हर-फेलिअरचा टळेल धोका!

Natural Way to Liver Detox : शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास लिव्हर मदत करतं आणि पचनातही महत्वाची भूमिका बजावतं. पण जास्त दारू किंवा चुकीच्या पदार्थांचं सेवन केल्याने लिव्हरवर जास्त दबाव पडतो. त्यामुळे लिव्हरमध्ये अनेक विषारी पदार्थ अडकून असतात. ज्यामुळे पुढे लिव्हर खराब होऊ शकतं. अशात लिव्हर डिटॉक्स करणं म्हणजे लिव्हर साफ करणं फार महत्वाचं ठरतं. हे काम तुम्ही घरीच नॅचरल पद्धतीने करू शकता. डायटिशिअन श्वेता शहा पांचाळ यांनी लिव्हर साफ करण्याचे 3 नॅचरल उपाय सांगितले आहेत.

पपईच्या बिया

पिकलेल्या पपईच्या बिया खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसेच लिव्हर साफ करण्यासाठी या बिया फार महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे यापुढे तुम्ही कधी पपई घरी आणली तर त्यातील बिया अजिबात फेकू नका. पपईच्या बिया सुकवा त्या रोस्ट करून खाऊ शकता. तसेच तुम्ही या बियांचं पावडर तयार करून सकाळी उपाशीपोटी पाण्यासोबत 30 दिवस सेवन करा. याने तुमचं लिव्हर पूर्णपणे साफ होईल. 

रोजचं रूटीन

जर तुम्ही दिनचर्याच चुकीचं असेल तर लिव्हरवर याचा फार वाईट प्रभाव पडतो. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही सूर्य उगवण्याच्या एक तास आधी झोपेतून उठा. दुपारचं जेवण तुम्ही 12 ते 1 वाजताच्या दरम्यान करा. रात्रीचं जेवण तुम्ही 7 वाजताच्या आत केलं पाहिजे आणि 10 वाजताच्या आत तुम्ही झोपायला हवं. 

उपवास

लिव्हर हा खूप मजबूत असा अवयव असतो. जो लागोपाठ काम करत असतो. पण आपण सतत काहीना काही खात असल्यानं लिव्हरला स्वत:वर काम करण्यासाठी वेळच मिळत नाही. लिव्हरला आराम मिळावा म्हणून तुम्ही आठवड्यातून निदान एक दिवस उपवास करू शकता. याने लिव्हर निरोगी आणि साफही राहील.

लिव्हरची शरीरातील कामे

लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं. पण या कामात लिव्हरवर खूप जास्त दबाव तयार होतो आणि हळूहळू त्याचं काम कमजोर होतं. यामुळे फॅटी लिव्हर, फेलिअर आणि कॅन्सरही होऊ शकतो. 

Web Title: Diet expert tells 3 natural way to liver detox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.