Join us

Diabetes tips : रोजच्या जगण्यात फक्त 'हे' छोटेसे बदल करा अन् आयुष्यभर डायबिटिसला लांब ठेवा; तज्ज्ञ म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 12:19 IST

Diabetes tips : खाण्यापिण्यातील अनियमितता, पौष्टिक घटकांचा अभाव, सतत कसला ना कसला ताण असणं  महिलांमध्ये असे आजार वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

ठळक मुद्दे खाण्यापिण्यातील अनियमितता, पौष्टिक घटकांचा अभाव, सतत कसला ना कसला ताण असणं  महिलांमध्ये असे आजार वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. पण जेवल्यानंतर त्यांनी किमान 15 मिनिटे चालायला हवे. तज्ञांचे म्हणणे आहे की शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

डायबिटिस एक अतिशय धोकादायक आजार आहे. याला सायलेंट किलर असेही म्हणतात, कारण लोकांना त्याची लक्षणे माहित नसतात. जरी शरीरातील काही बदलांमुळे ते ओळखणे सोपे आहे, परंतु असे असूनही, बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करतात, जे नंतर त्यांच्यासाठी घातक ठरते. महिलांच्याबाबतीत हे  जास्त पाहायला मिळतं की त्या  कामाच्या व्यापात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत.

खाण्यापिण्यातील अनियमितता, पौष्टिक घटकांचा अभाव, सतत कसला ना कसला ताण असणं  महिलांमध्ये असे आजार वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. या आजारात रुग्णांनी त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे, नाहीतर अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

म्हणूनच डायबिटीक रुग्णांना त्यांच्या आहार आणि जीवनशैलीची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या आजारात कोणत्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात आणि कोणत्या गोष्टी हानी पोहोचवू शकतात याबद्दल प्रत्येकाने जागरूक असले पाहिजे. इंटरनल मेडिसिन, डायबिटीज आणि हाइपरटेंशन कंसल्टेंट डॉ. अंबिका प्रसाद यादव यांनी अमर उजालाशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

डायबिटिसमध्ये काय खायला हवं?

सूर्यफूलाच्या बीया

भोपळ्याच्या बीया

आळशीच्य बीया

तीळ

टोफू, पालक, अक्रोड, सोया 

काय खाऊ नये? 

साखर

गूळ

आईसक्रीम

चॉकलेट

गोड

लाडू, जिलेबी, गुलाब जामुन इत्यादी गोड पदार्थ.

जीवनशैलीत हे बदल करा

सहसा, बर्‍याच लोकांना ही सवय असते की ते जेवल्यानंतर लगेच अंथरुणावर झोपतात. ही सवय खूप हानिकारक आहे. विशेषत: डायबिटीसच्या रुग्णांनी हे अजिबात करू नये.  पण जेवल्यानंतर त्यांनी किमान 15 मिनिटे चालायला हवे. तज्ञांचे म्हणणे आहे की शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

चांगल्या तब्येतीसाठी या गोष्टी लक्षात ठेवा

डायबिटीसच्या रुग्णांनी नाष्ता करायला विसरू नये.

रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठायला हवं.

जास्त मीठयुक्त पदार्थांचं सेवन करू नये

जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यायाल हवं. 

जास्त ताण घेऊ नका.

डायबिटीक रुग्ण प्रोटिन्स, फायबर्सयुक्त, मोड आलेली कडधान्यांचा आपल्या आहारात समावेश करू शकतात. रोज ठरलेल्या वेळी नाश्ता केल्यास  शरीर चांगले राहते. दही, अंडी, भाज्या,  फळे या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. डायबिटीस असलेल्या लोकांनी जास्त  तळलेल्या गोष्टी खाऊ नये. कारण यात चरबी आणि कॅलरीज जास्त असतात. म्हणून तळलेल्या पदार्थांपासून लांब राहणं फायद्याचं ठरतं.   

टॅग्स : मधुमेहहेल्थ टिप्सआरोग्य