Diabetes Symptoms : डायबिटीसची समस्या भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. पुढे सुद्धा तरूणांमध्ये हा आजार अधिक वाढणार असल्याचं मागे काही हेल्थ एक्सपर्टनी सांगितलं होतं. डायबिटीस हा एक असा आजार आहे जो आयुष्यभर आपल्या सोबत राहतो. याला पूर्णपणे दूर केलं जाऊ शकत नाही. केवळ कंट्रोल करता येतं. डायबिटीसची काही लक्षणं सामान्य वाटू शकतात. पण जर यांकडे दुर्लक्ष केलं तर गंभीर नुकसान होऊ शकतं. अशात डायबिटीसची काही मुख्य लक्षणं आपण पाहणार आहोत.
पुन्हा पुन्हा लघवी येणे
दिवसभर जर पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागत असेल, रात्री झोपेतूनही अनेकदा लघवीला जात असाल तर हे डायबिटीसच मुख्य लक्षण असू शकतं. शरीरात जेव्हा ग्लूकोजचं प्रमाण वाढतं, तेव्हा किडनी त्याला फिल्टर करण्याचा प्रयत्न करतात आणि जास्तीची शुगर लघवीवाटे बाहेर काढतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा लघवी लागते.
पुन्हा पुन्हा तहान लागणे
डायबिटीसच्या रूग्णांना पाणी प्यायल्यावरही लवकर आणि पुन्हा पुन्हा तहान लागते. कारण पुन्हा पुन्हा लघवी करून शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. जर गरमी नसेल आणि जास्त फिजिकल अॅक्टिविटी न करतानाही जास्त तहान लागत असेल, तर वेळीच ब्लड शुगर लेव्हलची टेस्ट करा.
जास्त थकवा
शरीरात ऊर्जा कमी असणं डायबिटीसचा संकेत असू शकतो. जेव्हा शरीरात इन्सुलिन योग्यपणे काम करत नाही किंवा कमी होतं, तेव्हा ग्लूकोज कोशिंकापर्यंत पोहोचू शकत नाही. ज्यामुळे शरीरात जास्त थकवा जाणवतो. जर पुरेशी झोप घेऊन आणि आराम केल्यावरही थकवा राहत असेल तर हा डायबिटीसचा संकेत असू शकतो.
अचानक वजन कमी होणे
जर डायटिंग करत नसाल, कोणता आजार नसेल आणि अचानक वजन वाढलं असेल तर हा डायबिटीसचा संकेत असू शकतो. शरीर जेव्हा ग्लूकोज एनर्जीमध्ये बदलत नाही, तेव्हा ते फॅट आणि मसल्सना तोडून ऊर्जा निर्मित करण्याचा प्रयत्न करतं. ज्यामुळे वजन अचानक कमी होतं.
जखम भरण्यास वेळ लागणे
जर जखम भरत नसेल किंवा कापलेली जागा उशिरा भरत असेल तर हा हाय ब्लड शुगरचा संकेत असू शकतो. डायबिटीसमध्ये ब्लड सर्कुलेशन आणि इम्यून सिस्टीम प्रभावित होते. ज्यामुळे शरीराची स्वत:ला रिपेअर करण्याची क्षमता स्लो होते. छोट्या जखमाही गंभीर रूप घेतात.
दृष्टी कमजोर होणे
डायबिटीसचा प्रभाव डोळ्यांवरही बघायला मिळतो. हाय ब्लड शुगरनं डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं. डायबिटीस झाला तर डोळ्यांनी धुसर दिसतं, जळजळ होते आणि अचानक दृष्टी कमी होते. याला डायबिटीक रॅटिनोपॅथी म्हणतात. वेळीच उपचार केले नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते.
डायबिटीसला सायलेंट किलर म्हटलं जातं. कारण याची लक्षणं एकदम नाही तर हळूहळू समोर येतात. तसेच बरेच लोक ही लक्षणं सामान्य समजून दुर्लक्ष करतात. जर वेळीच ही लक्षणं ओळखली तर मोठा धोका टाळता येऊ शकतो. जर कुटुंबात आधीच कुणाला डायबिटीस असेल आपणही एकदा ब्लड शुगर टेस्ट केली पाहिजे.