Join us
Daily Top 2 Weekly Top 5

झोप उडाली-दचकून जाग येते तर आधी शुगर तपासा, पाहा डायबिटिस असेल तर झोपेच्या कोणत्या तक्रारी वाढतात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:23 IST

वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशननुसार १९९० मध्ये जगभरात २० कोटी लोक डायबिटीसने पीडित होते, तेच २०२२ मध्ये ही संख्या वाढून जवळपास ८३ कोटी झाली आहे. 

Can Diabetes Cause Sleep Problems: डायबिटीस अलिकडे खूप जास्त वेगाने वाढणारा आजार झालाय. हे यावरून कळेल की, भारताला डायबिटीसची राजधानी मानलं जातं. म्हणजे देशात कोट्यावधी लोकांना डायबिटीस हा आजार आहे. जो मुळापासून दूर करण्यासाठी अजूनही काही ठोस औषध नाही. म्हणजे हा आजार आयुष्यभर आपला पिच्छा पुरवतो. कारण हा आजार फक्त कंट्रोल केला जाऊ शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशननुसार १९९० मध्ये जगभरात २० कोटी लोक डायबिटीसने पीडित होते, तेच २०२२ मध्ये ही संख्या वाढून जवळपास ८३ कोटी झाली आहे. 

डायबिटीस हा एक गंभीर आजार असूनही लोक याकडे गंभीरतेने बघत नाहीत. अनेकांना हे माहीत नसतं की, डायबिटीस झाल्यावर किडनी फेल्युअर, हार्ट अॅटॅक, स्ट्रोकचा धोका असतो. इतकंच नाही तर एखादा अवयव सुद्धा कापावा लागू शकतो. डायबिटीसची वेगवेगळी लक्षणं शरीरात दिसतात. जसे की, जास्त तहान लागणे, पुन्हा पुन्हा लघवी येणे, धुसर दिसणे आणि विनाकारण वजन कमी होणे. पण ब्रिटनच्या डायबिटीस यूके संस्थेनुसार एक असा कॉमन संकेत आहे ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात, तो झोपेशी संबंधित आहे.

डायबिटीसचा झोपेवर प्रभाव

डायबिटीस यूकेनुसार, ब्लड शुगर लेव्हलमध्ये सतत चढ-उतार होत असेल तर याने झोप प्रभावित होते. जेव्हा शरीरात शुगरची लेव्हल जास्त होते किंवा फार कमी होते, तेव्हा यामुळे रात्रीची झोप प्रभावित होते. त्याशिवाय डायबिटीससंबंधी अनेक समस्या जसे की, नर्व डॅमेज किंवा पाय दुखणे यामुळे सुद्धा झोपेत अडथळा निर्माण होतो. पुरेशी आणि चांगली झोप शरीरासाठी फार गरजेची असते. पण डायबिटीसने पीडितांना चांगली झोप लागणं अनेकदा अवघड होतं.

ब्लड शुगरचा झोपेवर प्रभाव

जर ब्लड शुगर फार कमी झाली तर या स्थितीला हायपोग्लायसीमिया म्हटलं जातं. ही स्थिती रात्री होऊ शकते आणि यामुळे झोपमोड होते. खासकरून टाइप १ डायबिटीस असलेल्या लोकांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. काही औषधांमुळेही ब्लड शुगर लेव्हल रात्री कमी-जास्त होऊ शकते. रात्री पुन्हा पुन्हा शुगर कमी झाल्याने दिवसा जास्त झोप किंवा थकवा जाणवतो. हळूहळू झोपेचा पॅटर्न बदलतो. हाय ब्लड शुगरमुळे पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागतं, ज्यामुळे रात्रीची झोप पूर्ण होत नाही. त्याशिवाय जास्त तहान लागणे आणि डोकेदुखीमुळेही झोप लागत नाही.

कमी झोपेने वाढतो डायबिटीसचा धोका

बऱ्याच संशोधनातून समोर आलं आहे की, झोपेसंबंधी समस्या डायबिटीसचा धोका वाढवू शकतात. २०२२ मध्ये यूनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल द्वारे करण्यात आलेल्या संशोधनात आढळलं की, ज्या लोकांना झोप येत नसेल किंवा गाढ झोप लागत नसेल तर त्यांच्या ब्लड शुगरचं प्रमाण जास्त आढळलं. डायबिटीस यूकेनुसार, चांगली झोप येण्यासाठी काही सवयी फायदेशीर ठरू शकतात. जसे की, दिवसा शारीरिक रूपाने सक्रिय रहा, झोपण्याआधी फोन - टीव्ही बघू नका, बेड आरामदायक असावा आणि झोपण्याआधी दारू पिऊ नका. रूमचं तापमान थोडं थंड ठेवा याने चांगली झोपण्यास मदत मिळेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Can Sleep Problems Control Sugar Levels? Diabetes and Sleep Changes

Web Summary : Diabetes affects sleep due to fluctuating blood sugar. Poor sleep worsens diabetes risk. Maintain sleep hygiene for better health. Control sugar levels.
टॅग्स : मधुमेहहेल्थ टिप्सआरोग्य