Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री पुन्हा पुन्हा तहान लागून जाग येणं बरं नाही, ‘या’ गंभीर आजाराचंही असू शकतं लक्षण

रात्री पुन्हा पुन्हा तहान लागून जाग येणं बरं नाही, ‘या’ गंभीर आजाराचंही असू शकतं लक्षण

Diabetes Sign At Night : जास्तीत जास्त लोक डायबिटीसच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाही आणि वाढता धोका टाळताही येत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:42 IST2025-08-25T15:44:11+5:302025-08-25T17:42:15+5:30

Diabetes Sign At Night : जास्तीत जास्त लोक डायबिटीसच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाही आणि वाढता धोका टाळताही येत नाही.

Diabetes night symptoms and signs you must not ignore | रात्री पुन्हा पुन्हा तहान लागून जाग येणं बरं नाही, ‘या’ गंभीर आजाराचंही असू शकतं लक्षण

रात्री पुन्हा पुन्हा तहान लागून जाग येणं बरं नाही, ‘या’ गंभीर आजाराचंही असू शकतं लक्षण

Diabetes Sign At Night : रात्री जर सतत तहान लागत असेल तर ही एक गंभीर समस्या असू शकते. आपल्याला माहीत असेलच की, डायबिटीस एक असा आजार आहे ज्यात शरीर हळूहळू आतून कमजोर होतं. चुकीची लाइफस्टाईल, अनहेल्दी डाएट, लठ्ठपणा आणि हाय ब्लड प्रेशर याची मुख्य कारणं असतात. पण जास्तीत जास्त लोक डायबिटीसच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाही आणि वाढता धोका टाळताही येत नाही. डायबिटीसची लक्षणं वेगवेगळी असतात. पण काही लक्षणं खासकरून रात्री दिसून येतात.

थकवा आणि कमजोरी

जर झोप पूर्ण केल्यावरही सकाळी थकल्यासारखं जाणवत असेल, कमजोरी जाणवत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. हा डायबिटीस किंवा ब्लड ब्लड शुगर लेव्हलमध्ये असंतुलनाचा संकेत असू शकतो. सोबतच ब्लर दिसत असेल तर हेही डायबिटीसचं एक लक्षण असू शकतं.

रात्री घाम येणं आणि हार्ट रेट वाढणं

जर रात्री झोपेत आपल्याला अचानक घाम येत असेल तर ही एक गंभीर समस्या आहे. रात्री झोपेत अचानक घाम येत असेल तर हा ब्लड शुगर वाढल्याचा संकेत असू शकतो. या स्थितीत शरीरात थरथरी, अस्वस्थता आणि कमजोरी जाणवू शकते. सतत तोंड कोरडं पडणं देखील डायबिटीसचा इशारा आहे.

पुन्हा पुन्हा तहान लागणं आणि लघवीची समस्या

रात्री जर पुन्हा पुन्हा तहान लागत आणि पाणी प्यायल्यावरही तहान शांत होत नसेल, तर हा डायबिटीसचा संकेत असू शकतो. त्याशिवाय जर रात्री सतत लघवीला जावं लागत असेल तर हा ब्लड शुगर हाय झाल्याचा संकेत असू शकतो. 

कधी करावं चेकअप?

जर ही लक्षणं पुन्हा पुन्हा दिसत असतील तर कानाडोळा न करता वेळीच डॉक्टरांना संपर्क केला पाहिजे. ब्लड शुगरची टेस्ट केली पाहिजे. जर वेळीच डायबिटीसची माहिती मिळाली तर याला कंट्रोल करणं सोप होतं आणि पुढील गंभीर आजारांचा धोकाही टाळता येतो.

Web Title: Diabetes night symptoms and signs you must not ignore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.