Detox Body Remedies: बदलती लाइफस्टाईल, बदलता आहार, वाढत्या जबाबदाऱ्या यामुळे बहुतेक लोकांना स्ट्रेसचा सामना करावा लागतोय. ज्यामुळे शरीरात वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. अशात वेळोवेळी बॉडी डिटॉक्स करणं गरजेचं असतं. यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातील एक म्हणजे पायांना आराम देऊन शरीर तणावमुक्त केलं जाऊ शकतं. कारण आपल्या पायांमध्ये ७ हजारांपेक्षा नर्व्स असतात, ज्यातील काही मोठ्या पोर्सच्या असतात, ज्या थेट लिम्फॅटिक सिस्टीमपर्यंत पोहोचतात. म्हणजे पायांच्या माध्यमातून बॉडी डिटॉक्स केली जाऊ शकते. यासाठी रोज थोडा वेळ खास पाण्यात पाय ठेवून बसायला हवं. याने शरीर आणि मेंदू दोन्हीना आराम मिळतो.
पायांनी बॉडी डिटॉक्स
इन्स्टाग्रामवर कॅमिले रोचेस्टर नावाच्या एका अमेरिकन महिलेने बॉडी डिटॉक्स करणारं खास पाणी तयार करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे सांगितले आहे. रोचेस्टर सांगतात की, बॉडी डिटॉक्स करणारं हे पाणी तयार करण्यासाठी केवळ तीन गोष्टी लागतील. रोज जर या पाण्यात २० मिनिटे पाय ठेवून बसाल तर शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतील. पायांच्या पोर्सच्या माध्यमातून सहजपणे शरीर डिटॉक्स केलं जाऊ शकतं.
पायांना आराम देण्यासाठी पाण्यात काय टाकावं?
रोचेस्टर सांगतात की, हे पाणी तयार करण्यासाठी थोडं गरम पाणी घ्या. या पाण्यात एक कप एप्सम सॉल्ट टाका, नंतर त्यात एक कप अॅपल सायडर व्हिनेगर टाका. तसेच यात थोडं रोजमेरी, लॅव्हेंडर किंवा आलं टाकू शकता. या पाण्यात साधारण २० मिनिटं पाय ठेवून बसा. गरम पाण्याने पायांचे पोर्स ओपन होतात. मिठातील मॅग्नेशिअमने शरीरातील हेवी मेटल बाहेर पडतं आणि स्नायू रिलॅक्स होतात. सूज कमी होते. तर व्हिनेगरने त्वचेचा पीएच लेव्हल बॅलन्स होतो आणि टिश्यूजमध्ये जमा टॉक्सिन सैल होऊ बाहेर पडतात.
या पाण्याचे फायदे
या खास पाण्यातून पाय काढल्यानंतर एखाद्या कोरड्या ब्रशने पायांच्या हार्टची म्हणजे पोटऱ्यांची मसाज करा. हा पायांमधील सगळ्यात महत्वाचं अवयव असतो. याने आपल्याला चांगली झोप लागेल, तणाव कमी होईल, आराम मिळेल आणि बॉडी डिटॉक्स होईल. या उपायाने मेंदूला सगळ्यात जास्त आराम मिळतो.
