Join us

अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 13:00 IST

ब्रश केल्याने फक्त दात स्वच्छ होत नाहीत तर तोंडात असलेले बॅक्टेरिया देखील कमी होतात. पण ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती हे तुम्हाला माहिती आहे का?

तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी दररोज दात घासणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ब्रश केल्याने फक्त दात स्वच्छ होत नाहीत तर तोंडात असलेले बॅक्टेरिया देखील कमी होतात. पण ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती हे तुम्हाला माहिती आहे का? डेंटल एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार, दातांची काळजी घेण्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश करणं आणि महागडी टूथपेस्ट वापरणं पुरेसे नाही, तर योग्य वेळी ब्रश करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. ९०% लोक चुकीच्या वेळी दात घासतात, ज्यामुळे दात किडतात आणि लवकर दात पडतात. अशा परिस्थितीत तोंडाची आणि दातांची स्वच्छता राखण्यासाठी ब्रश करण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ कोणती आहे ते जाणून घेऊया.

डेंटल एक्सपर्ट्सनी तोंडाच्या स्वच्छतेबाबत काही महत्त्वाची माहिती दिली आहे. अनेकदा आपल्याला असं वाटतं की जर आपण दिवसातून दोनदा ब्रश करत असू आणि चांगली टूथपेस्ट वापरत असू तर आपले दात पूर्णपणे सुरक्षित आहेत. पण बरेच लोक जेवणानंतर एका तासाच्या आत दात घासतात आणि नंतर झोपी जातात. मात्र असं करणं दातांसाठी हानिकारक ठरू शकतं.

जेवणानंतर लगेच तोंडात जास्त एसिड आणि बॅक्टेरिया असतात. अशा परिस्थितीत ब्रश केल्याने दातांचा इनॅमल कमकुवत होतं. यामुळे दात लवकर किडायला लागतात, सेन्सिटीव्हिटी वाढते आणि हिरड्यांच्या समस्या देखील सुरू होतात. त्यामुळे जेवणानंतर लगेच किंवा अर्ध्या तासानंतर ब्रश करणं टाळा. याशिवाय तुमच्या खाण्याच्या आणि ब्रश करण्याच्या वेळेत नीट अंतर ठेवा.

'या' गोष्टीही ठेवा लक्षात

-  ब्रश कधीही हार्ड नसावा. दात स्वच्छ करताना नेहमी सॉफ्ट ब्रश वापरा.

- ब्रश करताना तो थोडा ओला करायला विसरू नका. 

- ब्रश केल्यानंतर जीभ आणि हिरड्या स्वच्छ करणं देखील महत्त्वाचं आहे.

या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही तुमच्या दातांची आणि तोंडाच्या स्वच्छतेची योग्य काळजी घेऊ शकता.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स