Join us

दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 21:42 IST

रात्री दात न घासण्याचा निष्काळजीपणा तुमचा जीवही घेऊ शकतो, असा विचार तुम्ही कधी केला आहे का?

रात्री दात न घासण्याचा निष्काळजीपणा तुमचा जीवही घेऊ शकतो, असा विचार तुम्ही कधी केला आहे का? जपानमधील हिरोशिमा विद्यापीठात केलेल्या एका रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, हिरड्यांमध्ये वाढणारा धोकादायक बॅक्टीरिया पोर्फिरोमोनस जिंजिवलिस (P. gingivalis) थेट तुमच्या हृदयावर हल्ला करू शकतो. हे बॅक्टेरिया फक्त तुमचे दात आणि हिरड्याच नाही तर तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

रिसर्चनुसार, हे बॅक्टेरिया रक्तप्रवाहाद्वारे थेट हृदयाच्या लेफ्ट अ‍ॅट्रियममध्ये पोहोचू शकतात. तेथे ते फायब्रोसिसची म्हणजेच हार्ट टिशूजना स्टार टिशू बनवण्याची प्रक्रिया सुरू करतात, ज्यामुळे हृदयाची रचना बिघडते आणि 'अ‍ॅट्रियल फायब्रिलेशन' (AFib) नावाचा खतरनाक हार्ट रिदम डिसऑर्डरचा धोका वाढतो. या घातक स्थितीमुळे हार्ट ॲटॅक आणि स्ट्रोकसारखे मोठे आजार होऊ शकतात.

P. gingivalis चा धोका काय आहे?

या बॅक्टेरियामुळे प्रामुख्याने पीरियोडोंटायटीस म्हणजेच हिरड्यांना सूज आणि इन्फेक्शन होतं. याआधीही अनेक रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, ज्या लोकांना हिरड्यांच्या आजाराचा त्रास होतो त्यांना हार्ट ॲटॅकचा धोका जास्त असतो. अलिकडच्या मेटा-विश्लेषणात असं आढळून आलं की, पीरियोडोंटायटीस असलेल्या लोकांना अ‍ॅट्रियल फायब्रिलेशनचा धोका ३०% वाढतो.

हृदयावर कसा होतो परिणाम?

नवीन रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, हे बॅक्टेरिया प्रत्यक्षात हृदयापर्यंत पोहोचतात आणि थेट टिशूना नुकसान पोहोचवतात. या रिसर्चमध्ये मानव आणि प्राणी दोघांच्याही हृदयात हा बॅक्टेरिया आढळून आला आहे. हे बॅक्टेरिया मेंदू, लिव्हर आणि प्लेसेंटापर्यंत देखील पोहोचू शकतात हे देखील समोर आलं आहे.

कसा करायचा बचाव?

तज्ज्ञांच्या मते नियमित ब्रश करून, फ्लॉसिंग आणि डेंटल चेकअप करून तोंडांची स्वच्छ करा. हे फक्त तोंडाच्या आरोग्यासाठीच नव्हे तर हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचं आहे.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सदातांची काळजीकर्करोग