घरातल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित जिथल्यातिथे ठेवलेल्या आहेत, घरात अजिबात पसारा- धूळ नाही, सगळं घर एकदम स्वच्छ आणि टापटीप आहे, शिवाय ते खूप छान सजवून ठेवलेलं आहे.. असं जर घर असेल तर तिथे सगळ्यांचच मन रमतं. पण घर असं नेटकं ठेवण्यासाठी घरातल्या व्यक्तींना आणि मुख्यत: त्या घरातल्या स्त्रियांना खूप मेहनत घ्यावी लागते. काही जणींना त्याची उपजतच आवड असते. त्यामुळे त्यांना ते सहज जमतं. पण काही जणींना मात्र घर अस्वच्छ दिसलं किंवा घरातली एखादी वस्तू जरी इकडची तिकडे झालेली दिसली तरी खूप अस्वस्थ होतं. त्यांना त्या गोष्टीचा प्रचंड त्रास होतो. मग स्वत:ला जास्त काम पडलं तरी चालेल, पण आधी सगळं घर स्वच्छ करण्याकडे त्यांचा कल असतो. घराच्या स्वच्छतेच्या बाबतीत किंवा सजावटीच्या बाबतीत असा अतिरेकी हट्टाहास जर तुमचा असेल तर ते एक गंभीर लक्षण असू शकतं असं तज्ज्ञ सांगतात.
याविषयी काही एक्सपर्ट असं सांगतात की काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना सगळं जागच्याजागी हवं असतं. अन्यथा त्यांची भयंकर चिडचिड होते.
थंडीमुळे त्वचा कोरडी, भुरकट दिसतेय? रात्री झोपताना किचनमधले ४ पदार्थ लावा- त्वचा मऊ, चमकदार होईल
घराची स्वच्छता आणि सजावटीबाबत आपल्यासारखंच घरातल्या इतर व्यक्तींनीही वागावं असा त्यांचा आग्रह असतो. शिस्तीचा भाग म्हणून हे सगळं थोड्याफार प्रमाणात असेल तर ठिक आहे, पण त्यात खूप अति होत असेल तर अशा व्यक्तींना मात्र ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर म्हणजेच ओसीडी हा त्रास असतो.
त्या त्रासामुळे त्यांना घरातली प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट हवी असते. शिस्त आणि ओसीडी यांच्यामध्ये अगदी सुक्ष्म फरक असून तो ओळखून घेणे खूप गरजेचे आहे.
पार्लरमध्ये रेग्युलर जाणं होत नाही? आठवड्यातून २ वेळा 'हा' मास्क लावा, टॅनिंग कधीच होणार नाही
ओसीडीचा त्रास असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जेणेकरून त्या व्यक्तीला आणि तिच्या आजुबाजुच्या लोकांनाही या स्वभावाचा त्रास होत नाही.
Web Summary : Excessive obsession with cleanliness and order might indicate Obsessive Compulsive Disorder (OCD). Experts advise distinguishing between discipline and OCD, suggesting seeking professional help if needed.
Web Summary : अत्यधिक स्वच्छता और व्यवस्था का जुनून ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर (ओसीडी) का संकेत हो सकता है। विशेषज्ञ अनुशासन और ओसीडी के बीच अंतर करने की सलाह देते हैं, जरूरत पड़ने पर पेशेवर मदद लेने का सुझाव देते हैं।