भारतीय जेवण तेला - तुपाशिवाय अपूर्णच मानले जाते; हे दोन्ही पदार्थ भारतीय खाद्यसंस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे घटक मानले जातात. भारतीय स्वयंपाकघरात तूप आणि तेल हे दोन्ही असे पदार्थ आहेत, की जे तिन्ही वेळच्या जेवणात हमखास वापरले जातात. स्वयंपाकासाठी तेलाचा वापर तर प्रत्येक घरात होतोच, पण तूप देखील पोळी, भाजी आणि डाळ अशा सर्वच पदार्थांमध्ये मिसळले जाते. गरम वरण-भातावरची साजूक तुपाची धार असो किंवा चमचमीत भाजीला दिलेली तेलाची खमंग फोडणी, हे दोन्ही पदार्थ आपल्या रोजच्या आहाराचा अविभाज्य भाग आहेत. मात्र, अलिकडच्या काळात वाढलेले हृदयविकारांचे प्रमाण आणि 'बॅड कोलेस्ट्रॉल'च्या समस्यांमुळे, आपण नक्की किती प्रमाणात तेल - तूप खात आहोत याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे(daily desi ghee and oil limit for adults).
सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत अनेक पदार्थांमध्ये तेल किंवा तुपाचा वापर हमखास केला जातो. परंतु सध्याची बदलती लाईफस्टाईल, कमी शारीरिक (how much oil & ghee should eat daily) हालचाल आणि वाढत्या आरोग्य समस्यांमुळे आज ‘ नेमकं किती प्रमाणात तेल आणि तूप खावे?’ हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे. जास्त प्रमाणात तेल व तूप खाल्ल्यास हृदयरोग, लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतोच, तर याउलट योग्य प्रमाणात तेल - तूप खाल्ल्यास शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण मिळते. त्यामुळे भारतीयांनी एका दिवसात नेमके किती प्रमाणात तेल आणि तूप खावे, तसेच कोणते तेल आरोग्यासाठी अधिक (how much ghee & oil is safe per day) फायदेशीर आहे, हे जाणून घेण अत्यावश्यक आहे.
भारतीयांनी एका दिवसात नेमके किती प्रमाणात तेल आणि तूप खावे ?
गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी डॉ. प्रवीण चंद्रा यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीनुसार डॉ. चंद्रा म्हणतात की, भारतीयांची जी पारंपारिक खाण्याची पद्धत आणि स्वयंपाकाची संस्कृती आहे, त्यामध्ये हे ठरलेले असायचे की ज्या दिवशी आपण तळलेले-भाजलेले किंवा काही विशेष पदार्थ खातो, तर त्याचा अर्थ असा असायचा की कोणाचा तरी वाढदिवस आहे किंवा लग्न किंवा एखादा खास कार्यक्रम किंवा स्पेशल प्रसंग आहे.
डॉ. चंद्रा यांनी सांगितले की, पूर्वी जेवणाच्या ताटातील सर्वात महागडे पदार्थ म्हणजे तेल किंवा साजूक तूप असायचे आणि सर्वात स्वस्त गोष्टी म्हणजे जाडे भरडे धान्य, भाज्या इत्यादी असत. मुळेच त्याकाळी असे म्हटले जायचे की, जे लोक रोज किंवा जास्त प्रमाणांत तेल - साजूक तूप खातात त्यांनाच हार्ट अॅटॅक किंवा हृदयाशी आणि कोलेस्टेरॉलशी संबंधित समस्या सतावतात. परंतु आता याउलट झाले आहे आजच्या काळात हार्ट डिसीज अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. बदलता काळ सोबतच सतत बदलत जाणारी लाईफस्टाईल ज्यामुळे भारतीय थाळीचे संतुलन बिघडले आहे. तसेही भारतीय लोकांची जनुकीय रचना (Genes) अशी आहे की त्यांनी तेलकट - तूपकट पदार्थ कमीच खाल्ले पाहिजे. भारतीयांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल आधीच जास्त असते, ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो.
रोजच जागरण म्हणजे मरण जवळ येणंच! फार काम म्हणून रात्रीचा दिवस कराल तर आयुष्य होते कमी कारण...
तेल आणि तूप हृदयाच्या आरोग्यासाठी योग्य आहे का?
डॉक्टरांनी स्पष्ट केले की, साजूक तूप आणि व्हेजिटेबल ऑइल दोन्ही ठीक आहेत, परंतु ते 'हायड्रोजनकृत' (Hydrogenated) नसावेत. कोणत्याही तेलाला हायड्रोजनकृत केले की ते दाणेदार पांढरे (उदा. डालडा किंवा वनस्पती घी) होते, जे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते.
दिवसभरात नेमकं किती तेल - तूप खाऊ शकतो ?
डॉ. प्रवीण चंद्रा यांच्या मते, तुम्ही दिवसभरात १ ते २ चमचे तूप आणि तेल खाऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्ही एक चमचा तूप आणि एक चमचा तेल वापरू शकता. वनस्पती तेल आरोग्यासाठी चांगले मानले जाते, परंतु केवळ प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेले तेल खराब मानले गेले आहे. कारण त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असते आणि या तेलात खराब कोलेस्ट्रॉल वाढवण्याची क्षमता अधिक असते.
मेथीदाणा पाणी केसाला लावलेच नाही कधी? केसांसाठी अमृत-आजीबाईंच्या बटव्यातला घ्या उपाय...
हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी...
हार्ट अॅटॅकची प्रकरणे ज्या पद्धतीने वाढत आहेत, ती अत्यंत धक्कादायक आहेत. २०२२ च्या 'एनसीआरबी' (NCRB - नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) च्या आकडेवारीनुसार, भारतात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंपैकी ७० टक्के मृत्यू हे ३० ते ६० वर्षे वयोगटातील लोकांचे झाले आहेत. २०२२ मध्ये या कारणामुळे ३२ हजार ४५७ मृत्यूंची नोंद झाली होती.
Web Summary : Excessive oil/ghee increases heart disease risk. Limit intake to 1-2 teaspoons daily, favoring vegetable oils over animal fats. Maintain balanced diet for heart health.
Web Summary : अत्यधिक तेल/घी हृदय रोग का खतरा बढ़ाता है। प्रतिदिन 1-2 चम्मच सेवन सीमित करें, पशु वसा पर वनस्पति तेलों को प्राथमिकता दें। हृदय स्वास्थ्य के लिए संतुलित आहार बनाए रखें।