सकाळची सुरुवात जर प्रसन्न झाली नाही, तर पूर्ण दिवस नीरस जातो. सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि अपुरी झोप यामुळे 'पोट साफ न होणे' ही एक गंभीर समस्या बनली आहे. खरंतर असं म्हटलं जातं की, 'सर्व रोगांचे मूळ हे पोटात असते.' जर आपले पचनतंत्र (natural remedy for constipation) सुस्थितीत असेल, तर शरीर निरोगी राहते. मात्र, सध्याच्या 'जंक फूड' आणि बैठ्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना शौचास साफ न होण्याची समस्या सतावते. पोट साफ न झाल्यामुळे येणारा आळस, चिडचिडेपणा आणि त्वचेच्या समस्या यामुळे आपल्या एकंदरीतच आरोग्यावरच वाईट परिणाम होताना दिसतो(curd with jaggery for constipation relief).
पोट साफ होणे ही केवळ शारीरिक प्रक्रिया नाही, तर ती आपल्या संपूर्ण दिवसाच्या ऊर्जेशी जोडलेली असते. बऱ्याचदा आपण याकडे दुर्लक्ष करतो, पण ही छोटीशी समस्या मूळव्याध किंवा गंभीर पोटाच्या विकारांकडे नेऊ शकते. जर सकाळी पोट व्यवस्थित साफ झाले नाही, तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण दिवसावर आणि आरोग्यावर होतो. गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या आता सामान्य झाल्या आहेत. जर पोटातील घाण वेळेवर बाहेर पडली नाही, तर त्याचे रूपांतर मूळव्याध, त्वचा विकार आणि तीव्र ॲसिडिटीमध्ये होऊ शकते. पोट जड वाटणे, तोंड कडू होणे आणि दिवसभर आळस येणे ही सर्व लक्षणे तुमचे पचनतंत्र बिघडल्याचे संकेत आहेत. जर तुम्हालाही सकाळी तासंतास बाथरुममध्ये बसावे लागत असेल किंवा दिवसभर पोट जड वाटत असेल, तर पोट साफ करण्यासाठीचा (home remedies for constipation) एक सोपा, नैसर्गिक आणि रामबाण घरगुती उपाय पाहूयात...
दही आणि गुळाचा असरदार उपाय...
पोट साफ करण्यासाठी तसेच पचन सुधारण्यासाठी दही आणि गूळ एकत्र खाणे हा एक रामबाण घरगुती उपाय मानला जातो. दह्यामध्ये 'प्रोबायोटिक्स' (चांगले बॅक्टेरिया) असतात जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात. तर गुळामध्ये असलेले घटक पचन प्रक्रियेला गती देतात आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतात. रोज दुपारी जेवल्यानंतर एक वाटी ताज्या दह्यात थोडा गूळ मिसळून खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
बॉसची बडबड-कामाचा लोड यामुळे आलेला ऑफिसचा स्ट्रेस २ मिनिटांत कमी करणाऱ्या ५ टिप्स- व्हा रिलॅक्स!
उठणं - बसणंही झालं होतं कठीण, पण श्वेता तिवारीने 'या' घरगुती उपायाने कमी केलं युरिक अॅसिड...
दही कसे आहे फायदेशीर ?
दही हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक आहे. यामध्ये असलेले 'गुड बॅक्टेरिया' आपल्या आतड्यांना निरोगी ठेवण्याचे काम करतात.
१. अन्नाचे पचन नीट होण्यास मदत होते.
२. पोट साफ न होण्याची समस्या दह्यामुळे कमी होते.
३. पोटात होणारी जळजळ आणि गॅसची समस्या कमी करते.
४. जेव्हा आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते, तेव्हा मल विसर्जनाची प्रक्रिया नियमित आणि सुलभ होते.
गूळ कसे आहे फायदेशीर ?
गुळाला नैसर्गिक 'डिटॉक्सिफायर' मानले जाते, जो शरीर आतून स्वच्छ करते.
१. शरीरातील घाण बाहेर फेकण्यास मदत होते.
२. बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळते.
३. गुळामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.
४. गूळ आतड्यांची सफाई करतो आणि मल मऊ करण्यास मदत करतो, ज्यामुळे सकाळी कोणत्याही त्रासाशिवाय पोट सहज साफ होते.
दही आणि गुळाचा वापर कसा करावा?
एक वाटी ताजे आणि मध्यम आंबट चवीचे दही घ्या. त्यामध्ये बारीक केलेला गूळ घालून व्यवस्थित मिसळून घ्या. हे मिश्रण तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर किंवा सकाळी उपाशी पोटी खाऊ शकता. चांगल्या परिणामासाठी सलग ५ ते ७ दिवस हा उपाय न चुकता करून पाहा.
हा उपाय कसा आहे फायदेशीर ?
१. दही गुळाचे एकत्रित मिश्रण मल मऊ करते आणि आतड्यांची हालचाल सुधारते. यामुळे पोटातील साठलेली सर्व घाण नैसर्गिकरित्या बाहेर काढण्यास मदत होऊ शकते.
२. दही आणि गुळाचे मिश्रण एकत्र खाल्ल्याने आतड्यांमध्ये साठलेले टॉक्सिन्स आणि घाण हळूहळू बाहेर पडू लागते. पोट साफ करण्याचा हा एक उत्तम नैसर्गिक घरगुती उपाय आहे.
३. दह्याचा थंडावा आणि गुळाचे पाचक गुणधर्म मिळून पोटाचा समतोल राखण्यास मदत करतात, ज्यामुळे गॅसचा त्रास कमी होतो.
४. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. पोटातील घाण साफ करण्यासोबतच तुम्ही तुमची 'इम्यून सिस्टम' देखील बूस्ट करू शकता.
५. जेव्हा तुमचे पोट आतून स्वच्छ असते, तेव्हा त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो. यामुळे मुरुमे आणि डाग कमी होण्यास मदत होते.
पोट साफ ठेवण्यासाठी इतरही उपाय आहेत असरदार...
१. दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.
२. जेवणात मुबलक प्रमाणात फायबर असावे. यासाठी ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि कच्च्या कोशिंबिरीचा आहारात समावेश करा.
३. सकाळी उठल्यावर उपाशी पोटी १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे रात्रीची पोटातील घाण बाहेर पडण्यास मदत होते.
४. दररोज किमान २० ते ३० मिनिटे वेगाने चाला. शारीरिक हालचालीमुळे पचनक्रिया ॲक्टिव्ह राहते.
५. मानसिक ताणतणावाचा थेट परिणाम आपल्या पचनावर होतो. त्यामुळे योग किंवा ध्यानाच्या मदतीने स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करा.
