चहामुळे थकवा दूर होतो, मूड फ्रेश होतो. दिवसाची सुरुवात असो किंवा संध्याकाळचं छान वातावरण असो, पावसाळा असो किंवा ऑफिसची सुट्टी असो "एक कप चहा" प्रत्येक प्रसंगी प्रत्येकाला हवाच असतो. पण काहींना चहा इतका आवडतो की ते नेहमीच 'एक कप और' असं म्हणतात. एक कप आणखी चहाची सवय हळूहळू तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते.
डॉ. सरीन यांच्या मते, जास्त गरम चहा प्यायल्याने घशात जळजळ आणि फोड येऊ शकतात. जेव्हा ही जळजळ वारंवार होते तेव्हा इसोफेगल कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. याशिवाय चहामध्ये असलेलं कॅफिन वारंवार सेवन केल्याने एसिडिटी, निद्रानाश, हाय ब्लड प्रेशर आणि डिहायड्रेशन यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळेल आणि गरमागरम चहाच्या नादात हॉस्पिटलच्या चकरा माराव्या लागतील.
'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
- एसिडिटी किंवा गॅस
- घशात सतत जळजळ किंवा फोड येणं
- झोपेचा अभाव
- पुन्हा पुन्हा थकवा जाणवणं
- हृदयाचे ठोके वाढणं
- पोटात जळजळ होणं
काय करावं आणि काय करू नये?
- दिवसातून १ कपपेक्षा जास्त चहा पिऊ नका.
- चहा थोडा थंड करून प्या, तो खूप गरम पिऊ नका.
- चहासोबत बिस्किट, स्नॅक्स कमी खा, यामुळे पचन समस्या उद्भवू शकतात
- चहाऐवजी हर्बल टी, ग्रीन टी किंवा गरम पाणी प्या.
- हळूहळू चहाची सवय कमी करण्याचा प्रयत्न करा.