भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे आणि देशात कोरोना व्हायरसचे एक्टिव्ह रुग्ण १०१० पर्यंत वाढले आहेत. देशात कोरोना NB.1.8.1 आणि LF.7 च्या नवीन व्हेरिएंटच्या प्रवेशासह ही साथ पुन्हा एकदा परतत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहेत. महाराष्ट्रात २१० रुग्ण असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर दिल्ली (१०४) तिसऱ्या आणि गुजरात (८३) चौथ्या क्रमांकावर आहे. याच दरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) दिलासा दिला आहे. संसर्ग वेगाने पसरत आहे, परंतु काळजी करण्यासारखे काही नाही कारण ते गंभीर नाही असं म्हटलं आहे.
सर गंगा राम रुग्णालयातील सीनियर कन्सलटेंट डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन प्रोफेसर डॉक्टर एम. वली यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोना व्हायरसचा हा नवीन व्हेरिएंट जीवघेणा नाही, परंतु तो वेगाने पसरत आहे. जर गरज नसेल तरच घराबाहेर पडा. मास्क घाला. यासाठी कोणत्याही लसीची आवश्यकता नाही. जर अंगदुखी, खोकला आणि ताप यासारखी लक्षणं असतील तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. घाबरून जाण्याची गरज नाही."
कोरोनाचा कहर! अमेरिकेत नवा व्हेरिएंट, भारतात वाढले रुग्ण; हाँगकाँग-तैवानमध्ये परिस्थिती गंभीर
"कोरोना पुन्हा पुन्हा त्याचं रूप बदलत आहे. यामध्ये काळजी करण्यासारखं काहीच नाही. सिंगापूर, हाँगकाँग आणि चीनमध्ये रुग्ण जास्त आहे. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रवास करत असाल तर सावधगिरी बाळगणं आणि मास्क घालणं अधिक महत्त्वाचा आहे. कोरोनावर उपचार कसा करायचा हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही."
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी सोमवारी सांगितलं की, भारतात कोरोनाचा संसर्ग वाढत आहेत परंतु काळजी करण्याचं कारण नाही कारण हे गंभीर नाहत. सरकार प्रकरणांवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहे. संसर्गाची संख्या वाढली आहे आणि आम्ही त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. मात्र काळजी करण्यासारखं काही नाही कारण आतापर्यंतच्या सर्व कोरोना प्रकरणांमध्ये गंभीर रुग्णांचं प्रमाण सामान्यतः कमी आहे.