Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सर्वच लोक घरी बीपी मोजताना करतात ‘ही’ चूक, अचूक रीडिंग हवे असेल तर ‘एवढं’ करा...

सर्वच लोक घरी बीपी मोजताना करतात ‘ही’ चूक, अचूक रीडिंग हवे असेल तर ‘एवढं’ करा...

Correct Way to Measure Blood Pressure : How You Position Your Arm While Checking BP Doctor Told The Correct Way To Measure Blood Pressure : How to accurately measure blood pressure : घरच्याघरीच, रक्तदाब मोजण्याची योग्य पद्धत आणि बीपी मोजताना कोणत्या चुका टाळाव्यात ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2025 16:35 IST2025-06-25T17:00:54+5:302025-06-26T16:35:15+5:30

Correct Way to Measure Blood Pressure : How You Position Your Arm While Checking BP Doctor Told The Correct Way To Measure Blood Pressure : How to accurately measure blood pressure : घरच्याघरीच, रक्तदाब मोजण्याची योग्य पद्धत आणि बीपी मोजताना कोणत्या चुका टाळाव्यात ते पाहा...

Correct Way to Measure Blood Pressure How to accurately measure blood pressure How You Position Your Arm While Checking BP Doctor Told The Correct Way To Measure Blood Pressure | सर्वच लोक घरी बीपी मोजताना करतात ‘ही’ चूक, अचूक रीडिंग हवे असेल तर ‘एवढं’ करा...

सर्वच लोक घरी बीपी मोजताना करतात ‘ही’ चूक, अचूक रीडिंग हवे असेल तर ‘एवढं’ करा...

आपल्यापैकी बऱ्याचजणांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास असतो. ब्लड प्रेशर असल्यास ते अचानक कमी झाले किंवा किंचित वाढले तरी त्याचा त्रास होऊ शकतो. आजच्या काळात ब्लड प्रेशर (Correct Way to Measure Blood Pressure) कायम नियंत्रणात ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने फारच गरजेचे असते. जर रक्तदाब नियंत्रणात ठेवला गेला नाही, तर हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रक्तदाबावर वेळोवेळी लक्ष ( How You Position Your Arm While Checking BP Doctor Told The Correct Way To Measure Blood Pressure) ठेवणे खूप आवश्यक असते. आजकाल प्रत्येकजण आपल्या घरात एक ब्लड प्रेशरचे मशीन कायम ठेवतात, वारंवार डॉक्टरकडे जाण्याऐवजी किंवा अचानक गरज लागेल तेव्हा आपण याचा वापर करु शकतो(How to accurately measure blood pressure).

बहुतेकजण बीपी मोजण्यासाठी डॉक्टरकडे जाण्याऐवजी घरीच मशीनवर बीपी तपासणे पसंत करतात. परंतु घरच्याघरीच बीपी मोजताना काही लहानसहान चुका केल्या जातात, ज्यामुळे रक्तदाबाचे मोजमाप बरोबर येत नाही. यामुळे चुकीचे निदान होऊ शकते आणि आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. अशा परिस्थितीत, रक्तदाब मोजण्याची योग्य पद्धत कोणती आहे आणि बीपी मोजताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याबद्दल तज्ज्ञांकडून अधिक माहिती समजून घेऊयात. AIIMS ऋषिकेशमध्ये मेडिकल हेल्थ वर्कर म्हणून कार्यरत असलेले अंकित शर्मा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी घरीच बीपी मशीनवर बीपी मोजताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि अचूक रिडींग कसे घ्यावे हे सविस्तर सांगितले आहे. 

१. हाताची योग्य पोझिशन कशी असावी ?

अंकित शर्मा यांच्या मते, बीपी मोजताना रुग्णाचा हात पूर्णपणे सरळ आणि स्थिर असायला हवा. हाताला योग्य आधार मिळावा म्हणून तो टेबलसारख्या सपाट पृष्ठभागावर ठेवावा. याचबरोबर, हात खूप वर नको आणि खूप खाली देखील नको. हाताची पातळी ही हृदयाच्या समांतर लेव्हमध्ये असायला हवी. हृदयाच्या वर किंवा खाली हात असल्यास रीडिंग चुकीचे येऊ शकते. सरळ आणि योग्य पोझिशनमध्ये हात ठेवल्यानेच बीपीचे मोजमाप अचूक मिळते.

चेहऱ्यात दिसणारे ६ बदल सांगतात, आरोग्याच्या तक्रारी! वेळीच द्या लक्ष, उशीर नको व्हायला...

२. बीपी कफ कुठे आणि कसा बांधावा ?

अंकित शर्मा यांच्या मते, बीपी मोजण्यासाठी कफ हातावर बांधण्याची सुद्धा एक योग्य पद्धत असते. बीपीकफ हा हातांच्या कोपराच्या सांध्यापासून सुमारे ३ बोटं (अंगठ्याच्या रूंदीने) वर बांधावा. कफचा ट्यूब (पाइप) हा हाताच्या समोरच्या बाजूला, म्हणजेच कोपराच्या थोडाच वर असावा. कफ खूप घट्ट किंवा खूप सैल नको, एक बोट सहज जाईल इतका मोकळा असावा. कफ चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या पद्धतीने लावल्यास बीपी रीडिंग अचूक येत नाही, त्यामुळे हे योग्य रिडींग येण्यासाठी हे व्यवस्थित करणे आवश्यकच असते. 

३. बीपी कफ किती घट्ट बांधावा?

अंकित शर्मा सांगतात की वय आणि शरीराच्या आकारानुसार बीपी कफचा साइज वेगवेगळा असतो. लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी वेगवेगळ्या साइजचे कफ बाजारात उपलब्ध असतात. जर तुम्ही एखाद्या प्रौढ व्यक्तीचे बीपी मोजत असाल, तर त्यासाठी योग्य साइजचा कफ वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीच्या साइजचा किंवा चुकीच्या पद्धतीने बांधलेला कफ बीपी रीडिंग अचूक देऊ शकत नाही, त्यामुळे काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीनेच  बीपीकफ  बांधावा.

कोरडा खोकला खूप? नागवेलीच्या पानांच्या घरगुती औषधाने ढास होते कमी, घ्या डॉक्टरांचाही सल्ला...

इतरही गोष्टी लक्षात ठेवा... 

धावणे, चालणे किंवा कोणत्याही प्रकारचा एक्सरसाइज केल्यानंतर ताबडतोब बीपी मोजू नये. अशावेळी बीपी मोजल्यास रीडिंग जास्त (हाय) येऊ शकते, जे चुकीचं असू शकतं. त्यामुळे किमान ३० मिनिटे विश्रांती घेतल्यानंतरच बीपी मोजावे. अशा काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही घरीच योग्य पद्धतीने, अचूक बीपी मोजू शकता आणि आपले ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवू शकता.

Web Title: Correct Way to Measure Blood Pressure How to accurately measure blood pressure How You Position Your Arm While Checking BP Doctor Told The Correct Way To Measure Blood Pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.