आजकाल आपल्यापैकी अनेकजण फिटनेस आणि निरोगी राहण्यासाठी नॅचरल सुपरफूड्स खाणं पसंत करतात. हेल्दी राहण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात मेथी दाणे, अळशीच्या बिया तसेच चिया सीड्स, सूर्यफूल, भोपळ्याच्या बिया अशा विविध प्रकारच्या बिया आवर्जून खातो. या सुपरफूडमध्ये प्रामुख्याने पौष्टिक मेथी दाणे आणि अळशीच्या बियांचा समावेश अनेकजण आपल्या रोजच्या आहारात करतात. कोणी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मेथी दाणे खात आहे, तर कोणी हृदयाचे (correct way to eat fenugreek and flaxseeds) आरोग्य आणि वजन कमी करण्यासाठी अळशीच्या बिया न चुकता खातात... या छोट्या दिसणाऱ्या बियांमध्ये भरपूर पोषक घटक, फायबर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे वजन नियंत्रणापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत अनेक फायदे मिळू शकतात. मेथी दाणे, अळशी आपण खातो परंत्तू बऱ्याचजणांना ती कशी खावी याची योग्य पद्धतच माहित नसते(Methi ani alsi ekatra kashi khavi).
रोजच्या आहारात फक्त आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समाविष्ट केल्याने फायदा होतोच असे नाही. न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांच्या मते, अळशी आणि मेथीच्या बिया शरीरासाठी अत्यंत गुणकारी असल्या तरी, त्या कितीही प्रमाणात आणि कोणत्याही पद्धतीने खाणे चुकीचे ठरू शकते. कोणत्याही 'हेल्दी फूड'चा खरा फायदा आपल्या शरीराला तेव्हाच मिळतो, जेव्हा ते योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाल्ले जाते. अनेकदा चुकीच्या पद्धतीने या बिया खाल्ल्यामुळे फायद्याऐवजी शरीराला नुकसान सोसावे लागते. मग मेथी दाणे आणि अळशीच्या बिया खाण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती? त्या भिजवून खाव्यात की भाजून? आणि कोणत्या चुका टाळणे गरजेचे आहे? याबद्दलची माहिती न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे.
मेथी दाणे खाण्याचे फायदे काय आहेत?
मेथी दाणे खाण्याचा सल्ला सामान्यत डायबिटीज नियंत्रित ठेवण्यासाठी दिला जातो. हे इन्सुलिन रेझिस्टन्स नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतात. जर तुमचा फास्टिंग ग्लुकोज लेव्हल सतत जास्त राहत असेल, तर मेथी दाणे खाणं फायदेशीर ठरू शकते. पीसीओएसचा त्रास असलेल्या महिलांसाठीही मेथी दाणे खाणे उपयुक्त मानले जाते. तसेच काही संशोधनांनुसार हे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात. (correct way to eat fenugreek and flaxseeds)
मेथी दाणे खाण्याची योग्य पद्धत कोणती?
न्यूट्रिशनिस्ट लिमा महाजन यांच्यामते, रोज खूप जास्त प्रमाणात मेथी दाणे खाणे टाळावे. दिवसाला अर्धा ते एक चमचा मेथी दाणे खाणं पुरेसे असते. सर्वात चांगली पद्धत म्हणजे मेथी दाणे रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजत ठेवावेत आणि सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी व दाणे चावून खावेत. आपण हे जेवणापूर्वीही घेऊ शकता. चांगले फायदे मिळण्यासाठी सलग ६ ते १२ आठवडे हा उपाय करून पाहावा.
मेथी दाणे कुणी खाऊ नयेत ?
न्यूट्रिशनिस्टच्या लिमा महाजन यांच्यामते, जर तुम्ही डायबिटीससाठी औषध घेत असाल आणि त्याचवेळी मेथी दाणे खात असाल, तर रक्तातील साखरेची पातळी गरजेपेक्षा जास्त कमी होऊ शकते. या स्थितीला ‘हायपोग्लायसेमिया’ असे म्हणतात, जी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मेथी दाणे खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासत राहावी. याशिवाय, जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषध घेत असाल, तर मेथी दाणे खाल्ल्याने ब्लीडिंगचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत मेथी दाणे टाळणेच योग्य ठरते. गर्भावस्थेदरम्यान मेथी दाणे खाऊ नयेत तसेच, जर तुम्ही १ ते २ चमच्यांपेक्षा जास्त प्रमाणात मेथी दाणे घेत असाल, तर ब्लोटिंग (पोट फुगणे) आणि जुलाब होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मेथी दाणे खाताना योग्य प्रमाणाकडे विशेष लक्ष ठेवणे गरजेचे असते.
बिनसाखरेचा चहा बिंधास्त प्यायल्यानेही होते आहे आरोग्याचे नुकसान, डॉक्टर सांगतात, हे एक चुकतं कारण...
अळशीच्या बिया खाण्याचे फायदे काय आहेत?
अळशीच्या बिया कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास, हार्मोन्सचे संतुलन राखण्यास तसेच वजन नियंत्रणासाठीही फायदेशीर ठरतात. जर तुमचा बीपी वाढलेला असेल किंवा एकूणच हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल, तर आहारात अळशीच्या बियांचा समावेश करणे उपयुक्त मानले जाते.
अळशीच्या बिया खाण्याची योग्य पद्धत कोणती?
न्यूट्रिशनिस्टच्या मते, अळशीच्या बिया नेहमी पावडर करून मगच खावी. संपूर्ण बिया खाल्ल्यास शरीर त्यांचे योग्य पचन करू शकत नाही. त्यामुळे अळशीची पावडर करून ठेवावी आणि रोज फक्त एक चमचा आहारात समाविष्ट करावा. तुम्ही ही पावडर फळे, ताक, लिंबूपाणी किंवा पोळीच्या पिठात मिसळूनही घेऊ शकता.
अळशीच्या बिया कुणी खाऊ नयेत ?
न्यूट्रिशनिस्टच्या मते, अळशीच्या बिया खाताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात या बिया खाल्ल्यास पोट फुगणे, गॅस आणि जुलाब अशा समस्या त्रास देऊ शकतात. यासोबतच कोणतीही औषधे घेत असाल, तर अळशीच्या बिया त्याच वेळी किंवा लगेच घेऊ नयेत, कारण त्यामुळे औषधांचे शोषण कमी होण्याची शक्यता असते. कोणताही आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अळशीच्या बिया खाऊ नयेत.
Web Summary : Fenugreek and flax seeds are healthy, but consuming them incorrectly can cause harm. Nutritionist advises soaking fenugreek and powdering flax seeds for maximum benefit, aiding weight and sugar control. Consult a doctor if on medication.
Web Summary : मेथी और अलसी स्वस्थ हैं, लेकिन गलत तरीके से सेवन करने से नुकसान हो सकता है। पोषण विशेषज्ञ वजन और शुगर को नियंत्रित करने में मदद के लिए मेथी को भिगोकर और अलसी को पाउडर बनाकर खाने की सलाह देते हैं। दवा पर होने पर डॉक्टर से सलाह लें।