पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. बदललेली जीवनशैली, अपुरा आहार आणि पाण्याची कमतरता यामुळे अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. अशा वेळी, सकाळी गरम पाण्यात तूप मिसळून पिणे हा एक सोपा आणि प्रभावी आयुर्वेदिक उपाय मानला जातो. (Drink Ghee With Warm Water to Get Rid Of Constipation)
पचनसंस्थेसाठी फायदे
नैसर्गिक विरेचक (Laxative) म्हणून कार्य: तुपामध्ये नैसर्गिक लॅक्सेटिव्ह गुणधर्म असतात. गरम पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने आतड्यांना 'लुब्रिकेशन' मिळते, म्हणजेच आतड्यांमधील कोरडेपणा कमी होतो. यामुळे मल मऊ होतो आणि तो शरीरातून सहज बाहेर पडण्यास मदत होते. परिणामी, सकाळी पोट साफ होण्यास होणारा त्रास कमी होतो.
आतड्यांचे आरोग्य सुधारते
देशी तुपामध्ये ब्युटिरिक ॲसिड नावाचे महत्त्वाचे फॅटी ॲसिड असते. हे ॲसिड आतड्यांच्या भिंतींना पोषण देते आणि त्यांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. आतड्यांचे कार्य सुरळीत झाल्यास पचनक्रिया बळकट होते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर राहतात.
पचनक्रिया सुधारते
गरम पाण्यासोबत तूप घेतल्याने शरीराची चयापचय (Metabolism) क्रिया सुधारते. चांगले मेटाबॉलिझम म्हणजे अन्न जलद गतीने पचते आणि शरीरातील विषारी पदार्थ (Toxins) बाहेर टाकण्यास मदत होते, ज्यामुळे पोट आणि संपूर्ण शरीर डिटॉक्स होते.
इतर आरोग्य फायदे
त्वचेसाठी लाभदायक-तुपामुळे त्वचा आतून मॉइश्चराइज्ड राहते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक (Glow) येते.
हाडे होतात मजबूत- तुपामध्ये व्हिटॅमिन K2 असते, जे कॅल्शियम शोषण्यास मदत करते आणि हाडे मजबूत करते.
वजन नियंत्रणात मदत- काही तज्ञांच्या मते, सकाळी तूप-पाणी प्यायल्यानं पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि खाण्याची इच्छा कमी होते, जे अप्रत्यक्षपणे वजन कमी करण्यास मदत करू शकते.
सेवन करण्याची योग्य पद्धत
सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट किंवा गरम पाण्यात एक चमचा शुद्ध साजूक तूप मिसळून प्यावे. नियमितपणे हा उपाय केल्यास पचनसंस्थेशी संबंधित अनेक समस्यांवर आराम मिळू शकतो.कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी,विशेषतः तुम्हाला आधीच काही आरोग्य समस्या असल्यास, डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच उत्तम राहील.
Web Summary : Suffering from constipation? Ghee in warm water acts as a natural laxative, improving digestion and gut health. It softens stool, aids detoxification, and promotes overall well-being. Regular consumption can ease digestive issues.
Web Summary : कब्ज से परेशान हैं? गरम पानी में घी प्राकृतिक रेचक का काम करता है, पाचन और आंत के स्वास्थ्य में सुधार करता है। यह मल को नरम करता है, विषहरण में सहायता करता है और समग्र कल्याण को बढ़ावा देता है। नियमित सेवन से पाचन संबंधी समस्याओं से राहत मिल सकती है।