Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत मोबाइल - कम्प्युटरवर काम डोळ्यांना स्ट्रेस येतो - कोरडे पडलेत? करा ५ सोपे उपाय

सतत मोबाइल - कम्प्युटरवर काम डोळ्यांना स्ट्रेस येतो - कोरडे पडलेत? करा ५ सोपे उपाय

Constantly working on mobile - computer causes stress to the eyes, try these 5 easy solutions : सतत काम केल्याने डोळ्यांना त्रास होतो. तसेच इतरही अनेक कारणे आहेत, पाहा कशी काळजी घ्याल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2025 11:49 IST2025-05-18T11:48:07+5:302025-05-18T11:49:04+5:30

Constantly working on mobile - computer causes stress to the eyes, try these 5 easy solutions : सतत काम केल्याने डोळ्यांना त्रास होतो. तसेच इतरही अनेक कारणे आहेत, पाहा कशी काळजी घ्याल.

Constantly working on mobile - computer causes stress to the eyes, try these 5 easy solutions | सतत मोबाइल - कम्प्युटरवर काम डोळ्यांना स्ट्रेस येतो - कोरडे पडलेत? करा ५ सोपे उपाय

सतत मोबाइल - कम्प्युटरवर काम डोळ्यांना स्ट्रेस येतो - कोरडे पडलेत? करा ५ सोपे उपाय

आपल्याकडे अनेक प्रकारच्या छान उपमा दिल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे बोलके डोळे. एखाद्याचे डोळे इतके सुंदर असतात की डोळ्यांचे हावभाव शब्दांप्रमाणे संवाद साधू शकतात. एखाद्याचा आनंद डोळ्यात दिसतो. (Constantly working on mobile - computer causes stress to the eyes, try these 5 easy solutions)तसेच थकवाही डोळ्यात जाणवतो. डोळे हा दिवसभर कार्यक्षम असणारा अवयव आहे. त्यामुळे हातपाय जसे दुखतात, तसेच डोळेही दुखतात. दुखले नाहीत तर दमल्यासारखे जाणवतात. जड होतात. डोळ्यामध्ये स्पष्ट दिसून येते की डोळ्यांना आरामाची गरज आहे.  

आजकाल ऑफीसचे काम यंत्रांवरच चालते. दिवसातील किमान आठ तास सतत डोळ्यांसमोर मोबाइल, लॅपटॉप तसेच संगणक असतोच. (Constantly working on mobile - computer causes stress to the eyes, try these 5 easy solutions)त्यामुळे डोळ्यांना फार त्रास होतो. यंत्रणा वापरणे आता अनिवार्य आहे. पण डोळ्यांची काळजी घेणे नक्कीच आपल्या हातात आहे. मानसिक ताणतणाव असेल तर त्याचाही डोळ्यांवर परिणाम होतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे तर येतातच. मात्र डोळे हळूहळू मलूल व्हायला लागतात. त्यामुळे डोळ्यांची काळजी घ्या. अगदी साधेसोपे उपाय करता येतात. 

१. साजूक तूप अनेकदृष्ट्या औषधी असते. तसेच गायीचे तूप फार गुणकारी असते. रोज डोळ्यांना तसेच डोळ्यांच्या खालील भागावर साजूक तुपाने मसाज करायचा. अगदी दोन बोटं तूप लावले तरी खुप झाले. तुपामुळे डोळे स्वच्छ राहतात. डोळ्यांना आराम मिळतो. 

२. साधे खोबरेल तेल जे आपण केसांसाठी वापरतो किंवा स्वयंपाकघरातील जेवणासाठी वापरायचे खोबरेल तेल डोळ्यांना लावायचे. आठवड्यातून तीन ते चार वेळा लावले तरी पुरेसे आहे. तेलाच्या नियमित मसाजमुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळेही गायब होतात. 

३. काम नसताना मोबाइल वापरणे टाळा. तसेच काळोखात मोबाइल किंवा लॅपटॉप पाहू नका. डोळ्यांवर ताण येतो. स्क्रिन पाहण्यासाठी खास चष्मा मिळतो. तो चष्मा वापरा, त्याचा फायदा होतो.

४. डोळ्याला गुलाब पाणी लावायचे. कापसावर गुलाब पाणी घेऊन त्याने डोळे पुसायचे. डोळ्यावर गुलाब पाण्याचे गोळे ठेवायचे. डोळ्याला थंडावा मिळतो.

५. हिरवळीकडे पाहायचे. डोळ्यांना फारच आराम मिळतो. झाडांकडे फुलांकडे पाहायचे. डोळ्यांसाठी हा उपाय फार फायद्याचा ठरतो आणि करायला अगदीच सोपा आहे.               

Web Title: Constantly working on mobile - computer causes stress to the eyes, try these 5 easy solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.