Join us
Daily Top 2 Weekly Top 5

शरीराला सारखी खाज सुटते ? घामोळीने पाठ झाली लाल? ५ घरगुती उपाय , त्वचेसाठी गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2026 15:32 IST

Constant Itching or Heat Rash on Your Back? 5 Simple Home Remedies for Skin Relief : घामोळी कमी करण्यासाठी टिप्स.

उन्हाळा सुरू झाला की शरीराला सतत थंडावा देणारे पदार्थ खाण्याची आणि पिण्याची गरज वाटू लागते. उकाडा, घाम आणि थकवा यामुळे शरीर लवकर दमते. (Constant Itching or Heat Rash on Your Back? 5 Simple Home Remedies for Skin Relief)अशावेळी अनेक जण दुधात शरबत, कोको किंवा वेगवेगळे फ्लेवर घालून पितात. पण उन्हाळ्यात साधं थंडगार दूध कोणतेही पदार्थ न मिसळता पिणंही शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं.

साधं थंड दूध प्यायल्याने शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो. उष्णतेमुळे शरीरात निर्माण होणारी गरमी कमी करण्यास दूध मदत करतं. विशेषतः उन्हातून आल्यावर किंवा खूप घाम आल्यावर एक ग्लास साधं थंड दूध घेतलं तर शरीराला ताजेतवाने वाटू शकतं.

उन्हाळ्यात अनेकांना पित्त आणि अॅसिडिटीचा त्रास वाढतो. पोटात जळजळ होणे, आंबट ढेकर येणे किंवा पोटात आग झाल्यासारखं वाटणं अशा समस्या दिसतात. साधं थंड दूध प्यायल्याने पोटाला गारवा मिळतो आणि अॅसिडिटी कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे पोट शांत राहण्यास मदत होते. पित्तावर थंड दूध अगदी उत्तम उपाय आहे.

दुधात प्रोटीन, कॅल्शियम आणि अनेक आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे साधं दूध प्यायलं तरी शरीराला आवश्यक पोषण मिळतं. उन्हाळ्यात घामामुळे शरीर थकलेलं असतं, अशावेळी एक ग्लास दूध शरीराला ऊर्जा देण्यास मदत करू शकतं.

साधं दूध पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात अनावश्यक साखर किंवा इतर पदार्थ मिसळलेले नसतात. त्यामुळे ते पचायलाही तुलनेने हलकं राहतं. अनेक वेळा फ्लेवर किंवा साखर घातलेल्या दुधामुळे कॅलरी वाढतात, पण साधं दूध शरीरासाठी अधिक नैसर्गिक पर्याय ठरतो. याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी साधं दूध घेतलं तर शरीराला शांत वाटण्यास मदत होते. दिवसभराचा थकवा कमी होण्यासही मदत होऊ शकते.

मात्र दूध खूप बर्फासारखं थंड नसावं याची काळजी घ्यावी. फ्रिजमधून काढून थोडं  थंड झालेलं दूध पिणं अधिक चांगलं मानलं जातं. योग्य प्रमाणात आणि कोणतीही भेसळ न करता घेतलेलं थंड दूध उन्हाळ्यात शरीराला थंडावा, पोषण आणि ऊर्जा देण्यासाठी एक सोपा आणि उत्तम पर्याय ठरू शकतो.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Beat the Heat: Simple Ways Cold Milk Benefits Your Health

Web Summary : Drinking plain cold milk during summer offers natural cooling, reduces acidity, and provides essential nutrients. It helps combat fatigue, aids digestion, and promotes restful sleep. Avoid extremely cold milk for optimal benefits.
टॅग्स : समर स्पेशलआरोग्यत्वचेची काळजीहेल्थ टिप्सहोम रेमेडी