Join us
Daily Top 2 Weekly Top 5

सतत थकवा आणि कमजोरी येणं नाही सामान्य, पाहा कोणत्या गंभीर समस्येचं असू शकतं हे लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:56 IST

Fatigue and Weakness: सतत थकवा येत असेल तर हे कशाचं लक्षण असू शकतं हे आज आपण पाहणार आहोत. जेणेकरून याकडे दुर्लक्ष न करता वेळीच सावध होऊन योग्य ते उपाय करता येतील. 

Fatigue and Weakness : दिवसभर मेहनतीचं काम केल्यावर थकवा, कमजोरी जाणवणं साहजिक आहे. पण नेहमीच जर थकवा किंवा कमजोरी जाणवत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण नेहमीच असं होत असेल तर नक्कीच धोक्याची घंटा असू शकते. शरीरात काही बिघाड झाल्यावर ते वेगवेगळे संकेत देत असतं. अशात सतत थकवा येत असेल तर हे कशाचं लक्षण असू शकतं हे आज आपण पाहणार आहोत. जेणेकरून याकडे दुर्लक्ष न करता वेळीच सावध होऊन योग्य ते उपाय करता येतील. 

थकवा आणि कमजोरी

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, नेहमीच थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तर याचं कारण अ‍ॅनीमिया असू शकतं. शरीरात जेव्हा रक्ताची कमतरता होते, तेव्हा एनर्जीही कमी होते. पण अ‍ॅनीमियाचं केवळ हे एकच लक्षण नाहीये. याची काही इतरही लक्षणे असू शकतात. ती जाणून घेऊया.

अ‍ॅनीमियाची लक्षणं

थकवा आणि कमजोरीशिवाय त्वचा पिवळी पडणे किंवा श्वास भरून येणे अशी लक्षणेही जाणवू शकतात. सतत चक्कर येणे आणि हृदयाचे ठोके वाढणे हेही अ‍ॅनीमियाची लक्षणे आहेत. तसेच रक्त कमी झाल्यावर हात आणि पाय थंड पडतात. अशी लक्षणं जर एकत्र दिसली तर वेळीच सावध व्हावं आणि डॉक्टरांचा दाखवा.

रक्त वाढण्यासाठी काय खावं? 

जर आपल्याला शरीरातील रक्ताची कमतरता दूर करायची असेल तर रोज बीट आणि गाजर खाणं सुरू करा. तसेच नियमितपणे खजूर खावे, पालक खावी. या गोष्टींनी शरीरात रक्त वाढू शकतं. आयुर्वेदानुसार अ‍ॅनीमियाने पीडित लोकांनी नियमितपणे गूळ आणि चणे खावेत, तसेच शेवग्याची पाने सुद्धा यासाठी फायदेशीर ठरतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Persistent fatigue and weakness: Symptoms of a serious health problem?

Web Summary : Constant fatigue and weakness may signal anemia, indicated by pale skin, breathlessness, and dizziness. Increase blood levels by consuming beetroot, carrots, dates, spinach, jaggery, and drumstick leaves. Consult a doctor promptly.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स