Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > झोपेतून उठल्या उठल्या भरपूर लोक करतात 'या' चुका, डॉक्टर सांगतात काय काळजी घ्यावी

झोपेतून उठल्या उठल्या भरपूर लोक करतात 'या' चुका, डॉक्टर सांगतात काय काळजी घ्यावी

Morning Routine Mistakes : बऱ्याच लोकांना सवय असते की, झोपेतून उठल्यावर लगेच फोन बघू लागतात किंवा लगेच एखादं काम हाती घेतात. डॉक्टरांनुसार, असं केल्याने मेंदू अचानक हाय अलर्ट मोडमध्ये जातो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 10:02 IST2026-03-29T10:01:54+5:302026-03-29T10:02:56+5:30

Morning Routine Mistakes : बऱ्याच लोकांना सवय असते की, झोपेतून उठल्यावर लगेच फोन बघू लागतात किंवा लगेच एखादं काम हाती घेतात. डॉक्टरांनुसार, असं केल्याने मेंदू अचानक हाय अलर्ट मोडमध्ये जातो.

Common morning routine mistakes to avoid for better health and low stress | झोपेतून उठल्या उठल्या भरपूर लोक करतात 'या' चुका, डॉक्टर सांगतात काय काळजी घ्यावी

झोपेतून उठल्या उठल्या भरपूर लोक करतात 'या' चुका, डॉक्टर सांगतात काय काळजी घ्यावी

Morning Routine Mistakes : हल्ली आरोग्यासंबंधी होणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांमुळे बरेच लोक परफेक्ट मॉर्निंग रूटीन ट्रेंड फॉलो करू लागले आहेत. म्हणजे ते सकाळी झोपेतून लवकर उठतात, व्यायाम करतात, फोन - ई-मेल  चेक करतात आणि हेल्दी ड्रिंक किंवा कॉफी पितात. आता या गोष्टी बघायला फारच हेल्दी आणि फायदेशीर वाटतात. पण डॉक्टर सांगतात की, याच सकाळच्या हेल्दी वाटणाऱ्या सवयी शरीरावर उलटा प्रभाव करतात. डॉक्टरांनुसार, मूळ समस्या सवयींमध्ये नसून त्या करण्याच्या पद्धतीत आणि स्पीडमध्ये आहे. 

मुळात मानवी शरीर हे झोपेच्या अवस्थेतून बाहेर पडून लगेच एनर्जीने काम करण्याच्या अवस्थेत जात नाही. शरीराला यासाठी एका माध्यमाची गरज असते आणि जेव्हा हे साधन मिळत नाही तेव्हा चांगल्या सवयी फायद्याऐवजी तणाव वाढवतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या एका संशोधनातून समोर आलंय की, अचानक तणाव सक्रिय झाल्याने दिवसाच्या सुरूवातीलाच कोर्टिसोल हार्मोनची लेव्हल वाढू शकते. ज्यामुळे व्यक्तीचा मूड आणि फोकस हलतो. त्यामुळे बरेच लोक सकाळी कोणत्या चुका करतात आणि काय काळजी घ्यावी हे समजून घेऊया.

घाईने दिवसाची सुरूवात घातक

बऱ्याच लोकांना सवय असते की, झोपेतून उठल्यावर लगेच फोन बघू लागतात किंवा लगेच एखादं काम हाती घेतात. डॉक्टरांनुसार, असं केल्याने मेंदू अचानक हाय अलर्ट मोडमध्ये जातो. यामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन वाढतात. अशात चिडचिड, डोकेदुखी किंवा मानसिक थकवा जाणवतो.

हेल्दी रूटीनमध्ये वाढतोय स्ट्रेस

संशोधनानुसार, आजकाल एक हेल्दी मॉर्निंग रूटीन फॉलो करण्याचा दबाव वाढलाय. म्हणजे लगेच उठून भरभर कामे करावी. पण शरीर असं काम करत नाही. कोणत्याही तयारीशिवाय लगेच वर्कआउट किंवा लगेच फोन चेक करणं शरीरात स्ट्रेस वाढवू शकतं. त्यामुळे दिवसाची सुरूवात शांत आणि संतुलित असणं गरजेची आहे.

रात्रीच्या झोपेचा प्रभाव

जर रात्री जास्त वेळ फोन पाहिला तर झोप पूर्ण होत नाही आणि याचा प्रभाव सकाळच्या सुरूवातीवर पडतो. खराब झोपेचा प्रभाव स्मरणशक्ती, मूड आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर पडतो. त्यामुळे सकाळी फ्रेश रहायचं असेल तर झोप चांगली घेणं गरजेचं आहे. काही लोक सकाळी झोपेतून उठल्या उठल्या कॉफी पितात. डॉक्टरांनुसार ६ ते ७ तासांच्या झोपेनंतर शरीर हलकं डिहायड्रेट होतं. अशात आधी पाणी पिणं महत्वाचं असतं. पाण्याने मेंदू चांगल्या पद्धतीने काम करतं आणि थकवा कमी होतो.

शरीराला हवी हळू सुरूवात

डॉक्टर सांगतात की, सकाळी झोपेतून उठल्यावर पहिला एक तास शरीरासाठी फार महत्वाचा असतो. यावेळी शरीराचा सर्केडिअन रिदम सेट होतो, जो पूर्ण दिवस एनर्जी आणि मूडला प्रभावित करतो. जर यावेळी घाई केली गेली तर दिवसभर थकवा जाणवतो आणि फोकस करण्यास अडचण येते. 

कशी करावी दिवसाची सुरूवात? 

डॉक्टर सांगतात की, एका हेल्दी सकाळीसाठी काही सोप्या सवयी फॉलो केल्या पाहिजे. जसे की, हळू उठा आणि काही मिनिटे शांत बसा. त्यानंतर पाणी प्या, हलकं ऊन घ्या, स्ट्रेचिंग करा आणि नंतर वर्कआउट करा. तेच सकाळी झोपेतून उठून लगेच फोन बघू नका. दिवसाची सुरूवात सोप्या आणि शांत कामाने करा.

Web Title : ऊर्जावान दिन के लिए सुबह की इन गलतियों से बचें

Web Summary : दिन की शुरुआत में जल्दबाजी शरीर पर तनाव डालती है। पानी, स्ट्रेचिंग और धूप से धीरे-धीरे शुरुआत करें। शांत और अधिक केंद्रित दिन के लिए तुरंत फोन का उपयोग न करें। अच्छी नींद को प्राथमिकता दें।

Web Title : Avoid these morning mistakes for a healthy, energized day

Web Summary : Rushing into the day stresses the body. Start slowly with water, stretching, and sunlight. Avoid immediate phone use for a calmer, more focused day. Prioritize good sleep.