Extremely thirsty Causes : आपणा सगळ्यांना माहीत आहेच की, पाणी हे जीवन आहे. रोज दिवसभर भरपूर पाणी प्यायल्यानं आरोग्य चांगलं राहतं. सगळेच एक्सपर्ट रोज तीन ते चार लीटर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पाणी महत्वाचं आहेच, पण जर पण जर तुम्हाला दिवसभर सतत तहान लागत असेल, थोड्या थोड्या वेळानं पाणी प्यावं लागत असेल तर हे काही सामान्य लक्षण नाही. अशात वारंवार तहान लागण्याचं नेमकं कारण काय असतं हे माहीत असणं गरजेचं आहे. तेच आज आपण पाहणार आहोत.
सतत तहान लागण्याचं सर्वात सामान्य कारण
जेव्हा शरीरातील ब्लड शुगर खूप वाढते, तेव्हा किडनी लघवीद्वारे जास्त ग्लुकोज बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे वारंवार लघवी लागते आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. याच कारणानं व्यक्तीला सतत आणि खूप तहान लागते.
डायबिटीजची इतर लक्षणं
वारंवार लघवी लागणे
अचानक वजन कमी होणे
थकवा येणे
दृष्टी धूसर होणे
जास्त भूक लागणे
जास्त तहान लागण्याची इतर कारणं
डायबिटीस इन्सिपिडस
मुळात ही स्थिती ब्लड शुगरशी संबंधित नसते, पण लक्षणं जवळपास सारखीच असतात. वारंवार लघवी आणि सतत तहान. हे तेव्हा होतं जेव्हा शरीरात ADH (Anti-diuretic hormone) या हार्मोनची कमतरता निर्माण होते.
डिहायड्रेशन
शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झालं की सर्वात पहिलं लक्षण म्हणजे वारंवार तहान लागणे. डिहायड्रेशन पाणी कमी पिणे, प्रचंड उकाडा, घाम, उलटी किंवा जुलाब यामुळे होऊ शकतं.
किडनीचे आजार
किडनी शरीरातून वेस्ट आणि जास्तीचं पाणी बाहेर काढण्याचं काम करते. जेव्हा किडनी नीट काम करत नाही, तेव्हा शरीरात पाण्याचं संतुलन बिघडतं आणि तहान वाढते.
कधी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला?
जर आपल्याला सतत तहान लागत असेल, त्यासोबतच वारंवार लघवी लागते, सतत थकवा जाणवतो, वजन कमी होतंय, किंवा दृष्टी धूसर दिसते तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ब्लड शुगर व इतर आवश्यक तपासण्या करून घ्या. डायबिटीज हा एक “Silent Killer” आहे. पण वेळेवर निदान आणि योग्य काळजी घेतली, तर तो नियंत्रणात ठेवता येतो.