आंघोळ हा आपल्या रोजच्या डेली रुटीनचा अविभाज्य भाग आहे. आंघोळ केल्यामुळे आपल्याला फ्रेश आणि ताजेतवाने वाटते. शरीरातील थकवा आळस दूर करण्यासाठी अंघोळ करणे फायदेशीर ठरते. आपल्यापैकी बरेचजण दिवसातून सकाळ आणि संध्याकाळ अशी दोन वेळा आंघोळ करतात. प्रत्येक ऋतूमध्ये गरम पाण्याने (cold shower vs hot water bath benefits) आंघोळ करावी की थंड पाण्याने, हा प्रश्न अनेकांना पडतो. काही लोकांना गरम पाण्याची आंघोळ केल्याने आराम मिळतो, तर काही लोक थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. या दोन्ही पद्धतींचे स्वतःचे असे फायदे आणि तोटे (which is better cold or hot water shower for health) आहेत. खरंतरं, आंघोळ करताना थंड पाण्याने करावी की (cold vs hot shower health effects) गरम असा प्रश्न आपल्याला पडतोच. आंघोळीसाठी थंड पाणी वापरावे की गरम, या दोन्ही पद्धतींचे आरोग्यावर वेगवेगळे परिणाम होतात. ऋतू, शरीराची प्रकृती (bathing tips for health) आणि आपली तब्येत यानुसार योग्य पद्धत निवडल्यास आंघोळ शरीरासाठी अधिक आरोग्यवर्धक आणि सुखदायक ठरू शकते.
योग्य पद्धतीने आंघोळ केल्याने तुमचे मानसिक आरोग्य, केसांची निगा आणि रक्ताभिसरण सुधारू शकते. न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन सोनिया नारंग यांनी त्यांच्या इंस्टाग्राम @sonianarangsdietclinics वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की आंघोळ करण्याची योग्य पद्धत तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, केस गळणे कमी होते आणि अनेक आरोग्य समस्यांपासून बचाव करण्यास मदत होते.
इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये सोनिया नारंग सांगतात, "सकाळी थंड पाण्याने आणि रात्री गरम पाण्याने आंघोळ करावी. आंघोळीपूर्वी एक ग्लास पाणी प्यावे, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. डोक्यावर गरम पाणी टाकू नये, कारण त्यामुळे केस कमकुवत होतात. जर गरम पाण्याने आंघोळ करत असाल, तर शेवटच्या दोन मिनिटांसाठी थंड पाण्याने आंघोळ करा, यामुळे रक्ताभिसरण उत्तम राहते."
सकाळी थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे...
सोनिया नारंग सांगतात की, सकाळी थंड पाण्याने आंघोळ केल्याने झोप पटकन उडते. सकाळी थंड पाण्याची आंघोळ म्हणजे जणू मेंदूला रिचार्ज करण्यासारखे आहे. थंड पाण्यामुळे त्वचेतील सेन्सर्स मेंदूला ॲक्टिव्ह करतात. नॉरएड्रेनालिन नावाचा हार्मोन स्रवतो, जो मूड, अलर्टनेस आणि फोकस वाढवतो. यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, म्हणूनच तज्ज्ञ सकाळी थंड पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला देतात.
महागडं तेल केसांना चोपडताय? जावेद हबीब सांगतात, केसांसाठी योग्य तेल कोणतं-लावायचं कसं..
रात्री गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे...
रात्री आपल्या शरीराला रिलॅक्सेशनची गरज असते. गरम पाणी रक्तवाहिन्या थोड्या प्रमाणांत पसरवून किंवा हलक्याशा फुलवून स्नायूंना आराम देतात आणि चांगल्या झोपेसाठी शरीराला तयार करतात. गरम पाण्याने पॅरासिम्पेथेटिक नर्व्ह सिस्टम ॲक्टिव्ह होते, ज्यामुळे ताण कमी होतो आणि शरीर स्लीप मोडमध्ये जाते. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि झोप पटकन लागते.
आंघोळीपूर्वी एक ग्लास पाणी का प्यावे...
सोनिया नारंग यांच्या मते, आंघोळीपूर्वी एक ग्लास पाणी पिणे रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते. गरम पाण्याने आंघोळ केल्यावर रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. ज्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. शरीर डिहायड्रेटेड असल्यास चक्कर येणे किंवा बेशुद्ध होण्याची शक्यता असते. पाणी पिण्याने रक्ताभिसरण संतुलित राहते आणि अशा तक्रारी टाळता येतात. यासाठीच, आंघोळीपूर्वी एक ग्लास पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
पिंपल्स येऊ नयेत म्हणून तमन्ना भाटिया चेहऱ्याला रोज लावते एक विचित्र गोष्ट, पण डॉक्टर म्हणतात..
डोक्यावर गरम पाणी का टाकू नये...
डोक्यावर गरम पाणी टाकल्याने केस गळणे, कोरडेपणा आणि कोंड्याची समस्या वाढू शकते. गरम पाण्यामुळे स्काल्पमधील नैसर्गिक तेल (Sebum) निघून जाते, ज्यामुळे केस कोरडे आणि फ्रिझी होतात. केसांचे तंतू (Hair Strands) कमजोर होऊन तुटू लागतात आणि कोंड्याची समस्या वाढते. तज्ज्ञांच्या मते, केस धुण्यासाठी नेहमी कोमट किंवा थंड पाणीच वापरावे.
तुम्ही डाव्या कुशीवर झोपता की उजव्या? झोपेची पोझिशन सांगते तुमचा स्वभाव आणि आरोग्याचीही स्थिती...
आंघोळीच्या शेवटी थंड पाण्याने आंघोळ का करावी...
जर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल, तर शेवटची २ मिनिटे थंड पाण्याने आंघोळ करणे हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे प्रसरण पावलेल्या रक्तवाहिन्यांचा आकार व फैलाव आकुंचन करण्याचा व्यायाम होतो, रक्ताभिसरण सुधारते, सूज आणि थकवा कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्तीला देखील फायदा होतो.