Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आंघोळ थंड पाण्याने करावी की गरम? पाहा गार-गरम पाण्याचे फायदे-तोटे, दणकट तब्येत हवी तर..

आंघोळ थंड पाण्याने करावी की गरम? पाहा गार-गरम पाण्याचे फायदे-तोटे, दणकट तब्येत हवी तर..

Cold Shower Or Hot Shower- Which Is More Beneficial: कोणी थंड पाण्याने आंघोळ करतं तर कोणी गरम पाण्याने.. पण आपल्या तब्येतीनुसार आपल्यासाठी योग्य पाणी कोणतं कसं ओळखायचं?(health benefits of taking cold shower)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2025 15:30 IST2025-04-15T12:28:51+5:302025-04-15T15:30:28+5:30

Cold Shower Or Hot Shower- Which Is More Beneficial: कोणी थंड पाण्याने आंघोळ करतं तर कोणी गरम पाण्याने.. पण आपल्या तब्येतीनुसार आपल्यासाठी योग्य पाणी कोणतं कसं ओळखायचं?(health benefits of taking cold shower)

cold shower or hot shower which is more beneficial, health benefits of taking cold shower, health benefits of taking hot bath | आंघोळ थंड पाण्याने करावी की गरम? पाहा गार-गरम पाण्याचे फायदे-तोटे, दणकट तब्येत हवी तर..

आंघोळ थंड पाण्याने करावी की गरम? पाहा गार-गरम पाण्याचे फायदे-तोटे, दणकट तब्येत हवी तर..

Highlightsतुमच्या प्रकृतीनुसार तुमच्यासाठी कोणत्या पाण्याने आंघोळ करणं जास्त चांगलं?

आपल्या आजुबाजुला आपण असे अनेक लोक पाहताे जे कायम थंड पाण्याने आंघोळ करतात. मग तो अगदी पावसाळा किंवा हिवाळा असेल तरीही ते आंघोळीसाठी थंडच पाणी घेतात. एवढ्या थंडीत थंड पाण्याने आंघोळ हे ऐकूनच अनेकांना हुडहुडी भरते. पण जे हा नियम पाळतात ते मात्र अगदी फिट असतात (health benefits of taking cold shower). कारण त्यांच्या प्रकृतीला ते अनुकूल असतं. त्याउलट काही जण गरम पाण्याने आंघोळ करूनही हिवाळ्यातले अर्धे दिवस सर्दी- पडशाने हैराण असतात (health benefits of taking hot bath). त्यामुळेच आंघोळीसाठी कोणतं पाणी घ्यावं हे जर आपण आपल्या प्रकृतीनुसार ठरवलं तर त्याचा बराचसा फायदा होऊ शकतो.. म्हणूनच आता तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्यासाठी कोणत्या पाण्याने आंघोळ करणं जास्त चांगलं ते पाहूया..(Cold Shower Or Hot Shower- Which Is More Beneficial?)

 

गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

१. गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे आखडून गेलेले स्नायू मोकळे होऊन रिलॅक्स वाटते.

२. झोप अधिक चांगली येण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करणे अधिक फायदेशीर असल्याचे मानले जाते.

काकडीचं रायतं, कोशिंबीर तर नेहमीचीच, आता काकडीचं लोणचं खाऊन पाहा- घ्या चटपटीत रेसिपी

३. गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे शारिरीक, मानसिक त्रास कमी होतो.

४. श्वसन संस्थेसाठीही गरम पाण्याने आंघोळ करणे अधिक फायदेशीर मानले जाते.

५. ज्यांना सांधेदुखी, डोकेदुखीचा त्रास असतो, त्यांनी गरम पाण्याने आंघोळ करावी.

६. गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण अधिक चांगले होते.

 

थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

१. थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं म्हटलं जातं.

२. थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे एनर्जी जास्त वाढते.

क्रॉक्स घालताना ९० टक्के लोक 'ही' गंभीर चूक करतात, लहान मुलांच्याही मागे लागेल कायमचं दुखणं

३. जे लोक थंड पाण्याने आंघोळ करतात त्यांनी त्वचा आणि केस जास्त चांगले असतात.

४. शरीरातील टेस्टोस्टेरोन हार्मोन वाढतो. 

५. मनातले नकारात्मक विचार कमी होऊन मन शांत होण्यास मदत होते. 

Web Title: cold shower or hot shower which is more beneficial, health benefits of taking cold shower, health benefits of taking hot bath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.