Join us

थंड की कोमट...रात्री झोपण्याआधी कसं पाणी प्यावं? पचनासाठी कोणता पर्याय बेस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:39 IST

Health Tips : कोमट पाणी प्यायल्यानं आरोग्यासंबंधी वेगवेगळे फायदे मिळतात. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, कोमट किंवा गरम पाणी प्यायल्यानं पचन तंत्र सक्रिय होतं.

Health Tips : निरोगी जीवनशैलीसाठी पाणी पिण्याची योग्य वेळ आणि त्याचं तापमान फार महत्वाचं ठरतं. दिवसभर तर भरपूर पाणी प्यायलाच हवं. मात्र, खासकरून रात्री झोपण्याआधी पाणी पिणं शरीराच्या आरोग्यावर प्रभाव टाकतं. बरेच लोक असा विचार करतात की, रात्री झोपण्याआधी थंड पाणी पिणं योग्य राहील की कोमट. पचन आणि पोटाच्या आरोग्यासाठी झोपण्याआधी कोमट पाणी प्यावं की थंड हे जाणून घेऊ.

कोमट पाणी प्यायल्यानं आरोग्यासंबंधी वेगवेगळे फायदे मिळतात. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, कोमट किंवा गरम पाणी प्यायल्यानं पचन तंत्र सक्रिय होतं. कोमट पाण्यानं पोटातील स्नायू रिलॅक्स होतात आणि अन्न लवकर पचन होतं. तसेच शरीरातील विषारी तत्वही बाहेर पडतात. इतकंच नाही तर कोमट पाण्यानं त्वचा आतून क्लीन होते. तसेच ब्लड सर्कुलेशनही सुधारतं. ज्यामुळे पूर्ण शरीराला पोषण मिळतं. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर ती सुद्धा कोमट पाण्यानं दूर होऊ शकते. 

NCBI च्या एका रिपोर्टनुसार, थंड पाणी पचनक्रियेसाठी महत्वाच्या एंझाइम्सची क्रिया स्लो करतं. ज्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही. थंड पाण्यानं पोटातील स्नायू आकुंचन पावतात. ज्यामुळे पोट दुखू शकतं. थंड पाणी प्यायल्यानं शरीर थंड होऊ शकतं, ज्यामुळे झोपमोड होऊ शकते. जर तुमचा उद्देश पोट कमी करणं किंवा वजन नियंत्रित ठेवणं असेल तर रात्री झोपण्याआधी कोमट पाणी पिणं एक चांगलं पर्याय आहे. यानं शरीराचं मेटाबॉलिज्म वाढतं आणि फॅट बर्निंगची प्रोसेस वेगानं होते. 

कोमट पाणी कसं प्याल?

झोपण्याच्या साधारण ३० मिनिटांआधी एक ग्लास हलकं कोमट पाणी प्यायला हवं. हवं तर तुम्ही यात थोडा लिंबाचा रसही टाकून शकता. ज्यातून तुम्हाला व्हिटामिन सी मिळेल आणि पचनही चांगलं होईल. जर तुम्हाला मसालेदार पाणी प्यायला आवडत असेल तर यात थोडं आलं टाकूनही पिऊ शकता.

रात्री झोपण्याआधी कोमट पाणी प्यायल्यानं पचनक्रिया चांगली होते. यानं तुमचं पचन तंत्र सुधारतं आणि पोट हलकंही राहतं. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते. रात्री थंड पाणी पिणं हेल्दी मानलं जात नाही. कारण यानं पचनक्रिया स्लो होते आणि पोटात समस्या होतात. त्यामुळे रोज रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट पाणी प्यायला हवे.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स