Coconut Water Vs Glucose Water : तापमान वाढलं की, दिवसभर येणाऱ्या घामाने शरीर तर चिकट होतंच, सोबतच शरीरातील पाणी सुद्धा कमी होतं. ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होतं. त्यामुळे उष्माघातापासून बचावासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणं खूप गरजेचं असतं. डिहायड्रेशनमुळे चक्कर येऊ शकते आणि कमजोरीही जाणवते. अशात बरेच लोक या दिवसांमध्ये डिहायड्रेशन टाळण्यासाठी नारळाचं पाणी किंवा ग्लूकोजचं पाणी पितात. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, शरीराला यापैकी कोणतं ड्रिंक लवकर हायड्रेट करतं? चला तर पाहुयात दोन्हींमधील फरक....
नारळाच्या पाण्याचे फायदे
हायड्रेशनसाठी बेस्ट
नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स जसे की, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि सोडिअम भरपूर प्रमाणात असतात. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी साध्या पाण्यापेक्षा नारळाचं पाणी अधिक फायदेशीर असतं. खासकरून व्यायाम केल्यावर किंवा उन्हाळ्यात नारळ पाणी बेस्ट ठरतं.
हृदयासाठी फायदेशीर
नारळाच्या पाण्यातील पोटॅशिअमने ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. नियमितपणे नारळ पाणी प्यायल्याने बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं. याच बॅड कोलेस्टेरॉलने हृदयरोगांचा धोका वाढतो.
वजन कमी होतं
नारळाच्या पाण्याची खासियत म्हणजे यात कॅलरी कमी असतात. त्यामुळे जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यांच्यासाठी हे पाणी खूप फायदेशीर ठरतं. याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि पोट जास्त वेळ भरलेलं राहतं.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
नारळ पाण्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. यातील सायटोकिनिन त्वचा नेहमीच तरूण ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डागही कमी होतात.
पचन सुधारतं
नारळाच्या पाण्यातमध्ये फायबर आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचन तंत्र शांत राहतं.
ग्लुकोजचे फायदे
त्वरित ऊर्जा मिळते
ग्लुकोजचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते पचवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. ते थेट रक्तात मिसळून शरीरातील पेशींना लगेच ऊर्जा देतं. त्यामुळे थकवा किंवा अशक्तपणा जाणवल्यास ग्लुकोज घेण्याचा सल्ला दिला जातो.
मेंदूसाठी इंधन
आपला मेंदू शरीराच्या एकूण ऊर्जेचा मोठा भाग वापरतो आणि त्यासाठी मुख्य इंधन म्हणजे ग्लुकोजच आहे. योग्य प्रमाणात ग्लुकोज मिळाल्यास एकाग्रता वाढते आणि मानसिक थकवा कमी होतो.
स्नायूंची रिकव्हरी लवकर होते
जास्त व्यायाम किंवा शारीरिक काम केल्यानंतर शरीरातील साठवलेली ऊर्जा कमी होते. अशावेळी ग्लुकोज घेतल्यास स्नायूंना पुन्हा सक्रिय होण्यास मदत होते आणि रिकव्हरी वेगाने होते.
शरीराचे तापमान संतुलित ठेवते
तीव्र उष्णतेमध्ये घामामुळे शरीरातील ऊर्जा आणि पाण्याची कमतरता निर्माण होते. ग्लुकोज ऊर्जा देण्याबरोबरच शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि तापमान संतुलित ठेवण्यास मदत करते.
शरीराला पटकन हायड्रेट करणारे ड्रिंक कोणते?
जर तुम्हाला कमजोरी वाटत असेल आणि लगेच ऊर्जा हवी असेल तर ग्लुकोजचे सेवन करू शकता. मात्र दीर्घकाळ आरोग्यासाठी नारळाचं पाणी अधिक चांगलं मानलं जातं. कारण ते शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच आवश्यक मिनरल्सची कमतरताही भरून काढते, ज्यामुळे तुम्ही जास्त वेळ ताजेतवाने राहू शकता.
Web Summary : Coconut water is rich in electrolytes and minerals, ideal for hydration and overall health. Glucose provides quick energy and helps regulate body temperature, beneficial for immediate relief from fatigue.
Web Summary : नारियल पानी इलेक्ट्रोलाइट्स और खनिजों से भरपूर होता है, जो जलयोजन और समग्र स्वास्थ्य के लिए आदर्श है। ग्लूकोज त्वरित ऊर्जा प्रदान करता है और शरीर के तापमान को नियंत्रित करने में मदद करता है, थकान से तत्काल राहत के लिए फायदेमंद है।