Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पांढरेशुभ्र नारळाचे दूध असते एकदम पौष्टिक,त्वचाविकार ते पित्त सगळ्यावर रामबाण - शिवाय चवीला मस्त

पांढरेशुभ्र नारळाचे दूध असते एकदम पौष्टिक,त्वचाविकार ते पित्त सगळ्यावर रामबाण - शिवाय चवीला मस्त

coconut milk is extremely nutritious, add this food in your diet, if you have acidity related problems then this will help : नारळाचे दूध आरोग्यासाठी फार उपयुक्त असते. आहारात नक्कीच असावे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2025 13:25 IST2025-08-04T13:20:31+5:302025-08-04T13:25:00+5:30

coconut milk is extremely nutritious, add this food in your diet, if you have acidity related problems then this will help : नारळाचे दूध आरोग्यासाठी फार उपयुक्त असते. आहारात नक्कीच असावे.

coconut milk is extremely nutritious, add this food in your diet, if you have acidity related problems then this will help | पांढरेशुभ्र नारळाचे दूध असते एकदम पौष्टिक,त्वचाविकार ते पित्त सगळ्यावर रामबाण - शिवाय चवीला मस्त

पांढरेशुभ्र नारळाचे दूध असते एकदम पौष्टिक,त्वचाविकार ते पित्त सगळ्यावर रामबाण - शिवाय चवीला मस्त

काही पारंपरिक पदार्थ ठराविक सणांना किंवा ठराविक पदार्थांसोबत केले जातात. जसे महाराष्ट्रात फार लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी चवीला एकदम मस्त असते. (coconut milk is extremely nutritious, add this food in your diet, if you have acidity related problems then this will help)फार प्रसिद्ध आहे तसेच घरी केलेल्या साजूक तुपासोबत ही पोळी खाल्ली जाते. तसेच त्यासोबत कटाची आमटी असतेच. मात्र आणखी एक पदार्थ केला जातो. तो म्हणजे नारळाचे दूध. पुरणपोळी या नारळाच्या दुधात बुडवून खाण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. हे नारळाचे दूध फक्त चवीला छान नसते तर आरोग्यासाठीही फार चांगले असते.  

नारळाचे दूध पचनासाठी फार चांगले असते. या दुधात अॅण्टी बॅक्टेरियल सत्व असतात. तसेच कॅल्शिअम असते. लोह भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम असते. जीवनसत्त्व 'सी', 'ई', 'बी' यांचे प्रमाणही भरपूर असते. आतड्यांच्या आरोग्यासाठी हे दूध फायद्याचे ठरते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.  
काही जणांना गायीचे दूध पचत नाही. त्यांच्यासाठी बदामाच्या दुधाप्रमाणे हा ही एक पर्याय आहे. या दुधाचा अजिबात त्रास होणार नाही. 

त्वचेसाठी नारळाचे दूध अगदी उत्तम. त्वचा मऊ-मुलायम होते. त्वचेवरील डाग तसेच पिंपल्स, मुरुम आदी कमी होण्यासाठी या दुधाचा फायदा होतो.  हे दूध प्यायल्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. त्वचेला गरजेची असलेली आर्द्रता या दुधातून मिळते. केसांसाठी तर एकदम प्रभावी असा पदार्थ आहे. नारळ मुळातच केसांसाठी छान असतो. त्यामुळे नारळाचे दूध नियमित प्यायल्याने केस मऊ, मजबूत आणि दाट होतात.

नारळाच्या दुधाचा असा एक उपयोग आहे जो फार कोणाला माहिती नाही. अनेकांना पित्ताचा फार त्रास असतो. सतत उलट्या होतात, डोकं दुखतं. ज्यांना असे पित्त होते त्यांच्यासाठी नारळाचे दूध औषधी आहे. पित्ताचे प्रमाण कमी करुन पोटाला थंडावा देण्याचे काम हे दूध करते. नारळाचे दूध घ्यायचे आणि त्यात थोडा गूळ घालायचा. हे मिश्रण चवीला एकदम मस्त लागते. तसेच त्याचा आरोग्यासाठी फायदाही होतो. नारळाचे दूध चवीला छान असतेच आणि आरोग्यासाठीही फार फायद्याचे असते. त्यामुळे या पदार्थाचा आहारात नक्कीच समावेश करावा. पण अति प्रमाणात नारळाचा दूध पिऊ नका. त्याचा उलटा परिणाम होईल.    

Web Title: coconut milk is extremely nutritious, add this food in your diet, if you have acidity related problems then this will help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.