Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर

पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर

जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा घरी, ऑफिसमध्ये किंवा शॉपिंग मॉलमध्ये लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 13:55 IST2025-05-12T13:54:34+5:302025-05-12T13:55:15+5:30

जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा घरी, ऑफिसमध्ये किंवा शॉपिंग मॉलमध्ये लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा.

climbing stairs makes the heart stronger no fear of heart attack keeps these deadly diseases away study claim | पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर

पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर

पायऱ्या चढणं आणि उतरणं हा एक प्रकारचा कार्डिओ एक्सरसाइज आहे जो आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो. म्हणून, जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा घरी, ऑफिसमध्ये किंवा शॉपिंग मॉलमध्ये लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा.

एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, पायऱ्या चढल्याने केवळ आरोग्य सुधारत नाही तर आयुष्य देखील वाढू शकतं. या अभ्यासात जवळजवळ ५,००,००० लोकांच्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं, ज्यामध्ये पायऱ्या चढणं आणि कोणत्याही कारणामुळे मृत्यूचा धोका कमी होणं यांच्यात संबंध आढळून आला.

हृदयासंबंधीत आजाराचा धोका होईल कमी

अभ्यासानुसार, पायऱ्या चढणाऱ्यांना सर्व कारणांमुळे मृत्यूचा धोका २४% कमी होता. याव्यतिरिक्त, हृदयासंबंधीत आजारामुळे मृत्यूचा धोका ३९% ने कमी झाला.  हृदयासंबंधीत हे जगात होणाऱ्या मृत्यूचं मुख्य कारण आहे.

पायऱ्या चढण्याचे फायदे

तज्ञांच्या मते, पायऱ्या चढताना शरीर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध हालचाल करतं, ज्यामुळे ते इतर शारीरिक व्यायामांपेक्षा अधिक मजबूत होतं. अशा परिस्थितीत, पायऱ्या चढल्याने कार्डिओरेस्पिरेटरी फिटनेस सुधारतो आणि स्नायू देखील मजबूत होतात. हे कंबरेच्या खालच्या भागाचा, स्नायूंचा विकास करतं, ज्यामुळे हालचाल वाढते.

तुम्ही दररोज किती पायऱ्या चढल्या पाहिजेत?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जिना चढणं किती फायदेशीर आहे हे ठरवण्यासाठी पुरेसा रिसर्च झालेला नाही. परंतु एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की दररोज ५० पायऱ्या चढल्याने एथेरोस्क्लेरोसिसचा धोका २०% कमी होतो.
 

Web Title: climbing stairs makes the heart stronger no fear of heart attack keeps these deadly diseases away study claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.