Earbuds Side Effects: ईअरवॅक्स म्हणजेच कानातील मळ निघणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्याचं आपल्या शरीरात महत्वाचं काम असतं. स्वच्छतेबाबत सजग असणारे जास्तीत जास्त लोक कान साफ करतात. काही लोक हे काम आठवड्यातून एकदा करतात, तर काही लोक रोज करतात. बरेच लोक रिकामे बसले असताना कान करण्याचा आनंद घेताना दिसतात. कान साफ करण्यासाठी काही लोक तेल टाकतात, तर काही लोक ईअरबड्सचा वापर करतात. तर कुणी माचिसच्या काडीला कापूस गुंडाळून त्याने कान साफ करतात. लोकांचा समज असतो की, जशी शरीराची स्वच्छता गरजेची असते तशी कानाची देखील असते.
कानातील मळ घातक असतो का?
कानातील मळ ही काही घाण नसते, तो एक शरीराचा नॅचरल क्लीनर आहे. याचं काम धूळ, बॅक्टेरिया आणि इतर कण कानात जाण्यापासून रोखणे हा आहे. जास्तीत जास्त केसेसमध्ये जेव्हा आपण काही खातो किंवा बोलतो तेव्हा कानातील मळ सैल होऊन आपोआपच बाहेर येतो. त्यामुळे अनेकांना आपले कान साफ करण्याची गरज पडत नाही.
मळ कधी बनतो समस्या?
कधी कधी कानात जास्त मळ जमा होतो तेव्हा याला डॉक्टर इम्पॅक्शन म्हणतात. अशात आपल्याला कानात वेदना किंवा जडपणा जाणवतो, कानात घंटी वाजल्यासारखा आवाजही ऐकू येऊ शकतो, ऐकण्याची क्षमता कमी होते, खोकला येऊ शकतो किंवा कानातून दुर्गंधी सुद्धा येऊ शकते. ही समस्या अशा लोकांमध्ये जास्त होते जे हिअरींग एड किंवा इअरप्लगचा वापर करतात. तसेच वृद्ध लोक किंवा ज्यांच्या कानाच्या नळीचा आकार लहान असेल अशा लोकांमध्ये या समस्या बघायला मिळू शकतात.
रिसर्च काय सांगतो?
अमेरिकन अकॅडमी ऑफ ओटोलरींगोलॉजी, हेड अॅन्ड नेक सर्जरी फाउंडेशननुसार, कानात कॉटन स्वॅबचा वापर अजिबात करू नये. कारण कान स्वत:च साफ होतात. कॉटन स्वॅब टाकल्याने मळ आत जाऊ शकतो. ज्यामुळे कानावर दबाव पडू शकतो, ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते किंवा कानाच्या पडद्याचं नुकसान होऊ शकतं. सोबतच इन्फेक्शनचा धोकाही वाढतो.
हॉर्वर्ड हेल्थ पब्लिशिंगनुसार, मळ हा काही अस्वच्छतेचा संकेत नाही. हा कानासाठी फार महत्वाचा असतो. याने कानाच्या आतील त्वचा मॉइश्चराइज होते, धूळ - बाहेरील कण याने रोखले जातात, बॅक्टेरिया किंवा जंतू आत जाण्यापासूनही रोखले जातात.
ईअरबड्स किंवा कॉटन स्वॅबने नुकसान
ईअरबड्स किंवा कॉटन स्वॅबचा नियमित वापर केल्याने मळ जास्त आत जाऊ शकतो, ज्यामुळे कानात इन्फेक्शन होऊ शकतं. त्याशिवाय या गोष्टींनी कानाच्या नॅचरल लाइनचंही नुकसान होतं. ज्यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. अनेकदा कॉटन स्वॅब कानाच्या आत अडकतो आणि मग ते काढण्यासाठी डॉक्टरांकडे जावं लागतं. हेच कारण आहे की, कॉटन स्वॅबचा वापर करणं टाळलं पाहिजे.
