डायबिटीस असेल किंवा निदान झाल्यावर सर्वातआधी आपल्या आहारावर निर्बंध येतात. खाण्यावर मर्यादा आल्याने नेमकं काय खावं किंवा काय खाऊ नये असा सगळ्यांत मोठा प्रश्न पडतो...रक्तातील साखर वाढेल या भीतीने अनेकजण आपल्या आवडीची फळे खाणे पूर्णपणे सोडून देतात. फळांमध्ये नैसर्गिक साखर असली तरी, त्यातील फायबर्स शरीरासाठी आवश्यक असतात त्यामुळे डायबिटीस असेल तरी फळं खाणं आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे असते(cinnamon powder for diabetes).
डायबिटीस असलेल्या अनेकांना फळं खायची की नाही याबद्दल नेहमीच संभ्रम असतो. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे फळं खाल्ल्यावर रक्तातील साखर वाढेल अशी भीती अनेकांच्या मनात असते. म्हणूनच काहीजण पूर्णपणे फळं खाणं टाळतात. मात्र तज्ज्ञांच्या मते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने फळं (cinnamon benefits for diabetes) खाल्ल्यास ती डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठीही फायदेशीर ठरू शकतात. शुगर वाढेल म्हणून फळं खाणच सोडून देणं योग्य नाही तर ती योग्य प्रमाणात (how to use cinnamon for blood sugar control) आणि योग्य पद्धतीनं खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरु शकत...
डायबिटीस असताना फळं खाणं योग्य आहे का?
डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी फळं पूर्णपणे टाळण्याची गरज नसते. कारण फळांमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक घटक शरीराच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. मात्र फळं खाताना त्याचे प्रमाण, प्रकार आणि वेळ याकडे लक्ष देणे गरजेचे असते. उदा. सफरचंद, पेरू, पपई, बेरी यांसारखी फळं मध्यम प्रमाणात खाल्ल्यास ती तुलनेने सुरक्षित मानली जातात.
जिम - डाएट करूनही वजन कमीच होत नाही? मग स्वयंपाकाची ‘अशी’ रीत बदला, वजन घटायला लागेल झरझर...
रक्तातील साखर वाढेल या भीतीने अनेकजण आपल्या आवडीची फळे खाणे पूर्णपणे सोडून देतात. फळांमध्ये नैसर्गिक साखर (Fructose) असली तरी, त्यातील फायबर्स शरीरासाठी आवश्यक असतात. पण जर तुम्हाला फळे खाल्ल्यानंतर शुगर वाढण्याची भीती वाटत असेल, तर स्वयंपाकघरातील एक खास मसाला तुमच्यासाठी 'मॅजिक' ठरू शकतो. तो म्हणजे दालचिनीची पावडर! फळांवर फक्त चिमूटभर दालचिनी पावडर भुरभुरवून घातल्याने, फळं खाल्ल्यावर डायबिटीस वाढण्याची भीती राहत नाही. अनेकांना असे वाटते की, फळांमधील गोडव्यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी बिघडते. परंतु, दालचिनीमध्ये असे काही गुणधर्म आहेत जे रक्तातील साखरेला नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
पोट साफ नाही, तासंतास वॉशरुममध्ये बसता? वाटीभर दही आणि गुळाचा हा उपाय एकदम असरदार...
जेव्हा आपण फळे खातो, तेव्हा त्यातील नैसर्गिक साखरेमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी पटकन वाढू शकते. दालचिनी ही रक्तातील साखर शोषण्याची गती मंदावते. यामुळे फळ खाल्ल्यानंतर साखर एकदम वाढत नाही. दालचिनी शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्याचे काम करते. यामुळे शरीर रक्तातील साखरेचा वापर अधिक व्यवस्थित करू शकते, ज्यामुळे साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. फळांवर दालचिनी पावडर भुरभुरवून खाल्ल्याने केवळ साखरच नियंत्रित राहत नाही, तर यामुळे पचनक्रिया देखील सुधारते आणि चयापचय वेगवान होतो. फळांवर थोडी दालचिनी पावडर घातल्याने त्याची चव अधिक चांगली लागते आणि वेगळा फ्लेवर मिळतो.
फळे खाताना दालचिनीचा वापर कसा करावा?
सफरचंद, पेरू किंवा पपई यांसारख्या फळांच्या फोडी करून त्यावर चिमूटभर दालचिनी पावडर भुरभुरवून घाला. जर तुम्ही फळांची स्मूदी बनवत असाल, तर त्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर मिसळा.दह्यामध्ये फळांचे तुकडे आणि दालचिनी पावडर घालून खाणे हा डायबिटीस रुग्णांसाठी एक उत्तम नाश्ता ठरू शकतो. दालचिनी गुणकारी असली तरी ती दिवसाला १ ते २ ग्रॅमपेक्षा जास्त खाऊ नका. डायबिटीस असेल तर कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असलेली फळे निवडा, जसे की सफरचंद, संत्री किंवा नाशपाती. डायबिटीस असल्यामुळे फळं पूर्णपणे टाळण्याची गरज नसते. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने फळं खाल्ल्यास ती आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. फळांवर चिमूटभर दालचिनी पावडर भुरभुरवून खाल्ल्यास रक्तातील साखरेचे नियंत्रण राखण्यास मदत होऊ शकते.
