Donald Trump Disease: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या त्यांच्या आरोग्यासंबंधी समस्येमुळे चांगलेच चर्चेत आहेत. तसे तर ते नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. त्यांचे काही फोटो समोर आलेत ज्यात त्यांच्या उजव्या हातावर सूज दिसत आहे. यावर व्हाइट हाऊसने गुरूवारी एक स्पष्टीकरण दिलं. त्यात ते म्हणाले की, ट्रम्प यांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत आणि त्यांना "क्रोनिक व्हेन्स इनसफिशियन्सी" (chronic venous insufficiency) आजार असल्याचं समोर आलं. हा आजार नेमका काय आहे तेच आज आपण समजून घेणार आहोत.
काय आहे हा आजार?
क्रॉनिक व्हेन्स इनसफिशियन्सी म्हणजे नसांची कमजोरी. ही एक अशी कंडीशन आहे, ज्यात पायांच्या नसा सुरळीतपणे काम करू शकत नाहीत. रक्त पुन्हा हृदयाकडे परत पाठवण्याचं काम या नसांचं असतं. पण जेव्हा या नसा कमजोर किंवा खराब होतात. तेव्हा शरीराच्या खालच्या भागात जमा होऊ लागतं. ज्यामुळे नसांमध्ये दबाव वाढतो आणि वेगवेगळ्या समस्या सुरू होतात.
आजाराची कारणं काय आहेत?
हा आजार होण्याचं सगळ्यात कॉमन कारण म्हणजे डीप व्हेन्स थ्रॉम्बोसिस (DVT) म्हणजेच नसांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होणं. जेव्हा रक्ताच्या गाठी तयार होतात, तेव्हा नसांचं नुकसान होतं. नसा कमजोर होतात. तेव्हाच हा आजार होतो.
आजाराची लक्षणं?
- पायांमध्ये जडपणा वाटणे
- पायांमध्ये वेदना
- जळजळ आणि टोचल्यासारखं वाटणे
- रात्री पायात गोळे येणं
- पायाच्या त्वचेचा रंग बदलणे
- पाय आणि घोट्यामध्ये सूज
- खाज किंवा त्वचा ड्राय होणे
- घोट्याजवळचं मांस निघणे
- नसांमध्ये सूज
कुणाला जास्त धोका?
एक्सपर्ट सांगतात की, या आजाराचा सगळ्यात जास्त धोका 70 पेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये अधिक असतो.
आजारावरील उपाय?
chronic venous insufficiency या आजारावर ठोस असा काही उपाय नाही. हा आजार फक्त मॅनेज केला जाऊ शकतो. एक्सपर्टनुसार, मेडिकल ग्रेड कम्प्रेशन स्टॉकिंग्सचा वापर, पाय वर ठेवून बसणे, नियमितपणे वॉक करणे आणि वजन नियंत्रित ठेवून हा आजार कंट्रोल केला जाऊ शकतो. गंभीर केसेसमध्ये स्क्लेरोथेरेपी, व्हेन लिगेशन किंवा व्हेन स्ट्रिपिंग सारख्या सर्जरी केल्या जातात.