हिवाळ्यामध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही वाढतात. या काळात आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. हृदय हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. असं म्हटलं जातं की, चांगलं आयुष्य जगण्यासाठी हृदय निरोगी असणं गरजेचं आहे. आपलं हृदय निरोगी ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पोषक आहार घेणं, व्यायाम करणं आणि चांगली झोप घेणं.
आजकाल तरुणांनाही चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा त्रास होत आहे. कोणाला हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे तर कोणाला हाय कोलेस्टेरॉलची समस्या आहे. विशेषतः थंडीच्या काळात कोलेस्ट्रॉलची लेव्हल झपाट्याने वाढू लागते. थंडीत कोलेस्टेरॉल वेगाने का वाढतं, ते कसं कंट्रोल करायचं? हे जाणून घेऊया...
शरीराला जास्त ऊर्जा लागते
हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. अशा परिस्थितीत आपण आपल्या आहारात अधिक कॅलरीजचा समावेश करत राहतो. हिवाळ्यात तळलेले अन्न खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची लेव्हल वाढते.
व्हिटॅमिन डीची कमतरता
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करायची असेल तर सूर्यप्रकाशापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो, त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता सुरू होते. कोलेस्टेरॉलची लेव्हल नियंत्रित ठेवण्यास व्हिटॅमिन डी मदत करतं.
व्यायामाचा अभाव
हिवाळ्यात, बहुतेक लोकांना अंथरुणातून उठायला कंटाळा येतो. अशा परिस्थितीत व्यायाम किंवा चालणं शक्य होत नाही. यामुळे शरीरात चरबी जमा होण्यास सुरुवात होते, त्यामुळे कोलेस्टेरॉलची लेव्हल वाढते.
हाय कोलेस्टेरॉल कसं कंट्रोल करावं?
- हिवाळ्यात तुम्ही एक्टिव्ह राहा. तुम्ही व्यायाम किंवा वर्कआऊट करा.
- योगासने आणि प्राणायाम देखील करू शकता. धावणं शरीरासाठी उत्तम ठरू शकतं.
- हिवाळ्यात जंक फूड कमी खा. मीठ देखील कमी वापरा. कारण ते घातक ठरू शकतं.
- हिवाळ्यात व्हिटॅमिन डी युक्त आहार घ्या.
- तुमच्या आहारात फायबरचा समावेश नक्की करा.
- फायबरमुळे कोलेस्टेरॉलची लेव्हल कमी होते.
- अति तणावामुळेही कोलेस्टेरॉल वाढू शकतं. तुम्ही तणाव किंवा टेन्शन घेणे टाळावं.
- ध्यान, प्राणायाम किंवा दीर्घ श्वासोच्छवासाच्या व्यायामाने तुम्ही तणावमुक्त राहू शकता.
- हिवाळ्यात पाणी पिणं बंद करू नका. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने तुम्ही अनेक आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकाल.
- चांगली झोप ही निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे. आठ तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा.