आजच्या काळात टिकाऊ आणि सोईस्कर वस्तूंना जास्त महत्व आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण जेवढे तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत, तेवढेच आपण कृत्रिम वस्तूंवरही अवलंबून आहोत. (Children are getting 'these' serious diseases due to using plastic containers and bottles, adults should be careful)या वस्तूंमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे प्लास्टिकच्या असतात. सकाळी ऑफिससाठी टिफिन भरताना, शाळेत मुलांना पाणी द्यायला, किंवा बाजारात वस्तू घेण्यासाठी प्लास्टिकची पिशवी वापरताना आपण त्याच्या परिणामांचा विचारही करत नाही. मात्र या सोयीमागे आपल्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा मोठा धोका दडलेला असतो.
प्लास्टिक दिसायला आकर्षक आणि हलके असते, त्यामुळे अनेकांना ते आदर्श पर्याय वाटते. पण त्याच्या वापराचे परिणाम भीतीदायक आहेत. प्लास्टिकच्या डब्यांमध्ये व बाटल्यांमध्ये बिस्फेनॉल-ए (BPA), फ्थॅलेट्स आणि इतर हानिकारक रसायने असतात. हे रसायने गरम पदार्थांशी किंवा पाण्याशी संपर्कात आल्यानंतर त्यात मिसळतात आणि त्यासोबत शरीरात प्रवेश करतात. या रसायनांमुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. स्त्रियांमध्ये प्रजनन समस्या, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होणे, तसेच मुलांमध्ये वाढीशी संबंधित अडचणी दिसून येतात. दीर्घकाळ प्लास्टिकच्या संपर्कात राहिल्यास कर्करोग, थायरॉईडचे विकार, मधुमेह आणि अंतःस्रावी ग्रंथींचे आजार होण्याची शक्यता वाढते. अनेक अभ्यासकांनी हे मुद्दे मांडले आहेत.
आरोग्याच्या जोडीला पर्यावरणावर होणारे दुष्परिणामही गंभीर आहेत. प्लास्टिक हा असा पदार्थ आहे जो सहज नष्ट होत नाही. त्याचे विघटन होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. त्यामुळे तो मातीमध्ये आणि पाण्यात मिसळून प्रदूषण वाढवतो. प्लास्टिकमुळे जमिनीची सुपीकता कमी होते. ही ठिकाणी हा कचरा जाळला जातो, कचऱ्यात प्लास्टिकही जाळले जाते पण जळताना त्यातून डायऑक्सिन्स आणि फ्युरान्स सारखे विषारी वायू निघतात. जे श्वसनासंबंधी आजार, अॅलर्जी आणि त्वचारोग निर्माण करतात.
प्लास्टिकऐवजी स्टीलचे डबे आणि बाटल्या वापरणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. ते दीर्घकाळ टिकतात, रसायनमुक्त असतात आणि अन्नाचे पोषणमूल्यही टिकवून ठेवतात. काचेच्या भांड्यांमध्ये अन्नाची चव बदलत नाही आणि ते स्वच्छ ठेवणे सोपे असते. मातीच्या भांड्यांमध्ये ठेवलेले पाणी नेहमी नैसर्गिकरित्या थंड राहते आणि त्यातून कोणतेही विषारी घटक बाहेर पडत नाहीत. याशिवाय बांबू, नारळाच्या शेंड्यांपासून तयार वस्तू किंवा ज्यूटचे डबे आणि पिशव्या हेही उत्कृष्ट पर्याय आहेत, कारण ते जैविकरित्या विघटनशील (biodegradable) असतात आणि पर्यावरणाचे नुकसान करत नाहीत.
Web Summary : Plastic containers leach harmful chemicals, disrupting hormones and causing health issues like cancer and infertility. Environmentally, plastic persists, polluting soil and releasing toxic gases when burned. Opt for steel, glass, or biodegradable alternatives for safety.
Web Summary : प्लास्टिक के डिब्बों से हानिकारक रसायन निकलते हैं, जो हार्मोन को बाधित करते हैं और कैंसर व बांझपन जैसी स्वास्थ्य समस्याओं का कारण बनते हैं। पर्यावरण की दृष्टि से, प्लास्टिक बना रहता है, मिट्टी को प्रदूषित करता है और जलाने पर जहरीली गैसें छोड़ता है। सुरक्षा के लिए स्टील, कांच या बायोडिग्रेडेबल विकल्प चुनें।