Join us

पोट सुटलंय-मांड्या खूप जाड दिसतात? रिकाम्यापोटी 'हे' पाणी प्या, तब्येतीच्या तक्रारीच होतील बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:07 IST

Chia Seeds Water For Weight Loss : चिया सिड्स फायबर्स आणि प्रोटीन्सनी परीपूर्ण असतात. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर सकाळी चिया सिड्सचे पाणी पिणं हा उत्तम  मार्ग आहे.

चिया सिड्स (Chia Seeds) तब्येतीसाठी चांगले मानले जातात. पोषक तत्वांनी परीपूर्ण चिया सिड्सच्या सेवनानं एनिमियाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यास मदत होते. ज्यामुळे हाडं मजबूत होतात, पचनक्रिया चांगली राहते, स्मरणशक्ती, त्वचा, केस हेल्दी राहण्यास मदत होते.

चिया सिड्समध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्स जास्त प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त यात पोटॅशियम, फायबर्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, जिंक, कॉपर, ओमेगा ६, फॅट्स, सोडीयम, फॉस्फरस, जस्त, कॅल्शियम, मॅन्गनिज असते. यामुळे वजन कमी करण्यास बरेच फायदे होतात. (Chia Seeds Water For Weight Loss Health Benefits Of Chia Seeds)

चिया सिड्स फायबर्स आणि प्रोटीन्सनी परीपूर्ण असतात. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर सकाळी  चिया सिड्सचे पाणी पिणं हा उत्तम  मार्ग आहे. यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं. ज्यामुळे दिवसभर खाण्याची इच्छा होत नाही. याव्यतिरिक्त तुम्ही नाश्त्यात स्मूदी, दही किंवा चिया सिड्स मिसळून खाऊ शकता.

पाकिस्तानी डॉक्टरांचा व्हायरल व्हिडिओ, चेहऱ्यावरचे डाग घालवणारा बिटचा खास उपाय, चमकदार त्वचेचा दावा

चिया सिडसच्या सेवनाचे इतर फायदे

वजन कमी करण्यात चिया सिड्स फायदेशीर ठरतात. ज्यामुळे त्वचा तरूण दिसते.  पचनही उत्तम राहते डायबिटीस नियंत्रणात राहतो. स्मरणशक्ती चांगली राहण्यास मदत होते. 

चिया सिड्सचे पाणी कसे तयार करावे?

सगळ्यात आधी १ तासासाठी अर्धा ग्लास पाणी चिया सिड्समध्ये घालून भिजवून ठेवा. यात फायबर्स जास्त प्रमाणात असतात. हे जेलप्रमाणे होते नंतर गाळून घ्या. या सिड्स एक ग्लास पाण्यात मिसळा. नंतर लिंबाचा रस आणि मध घालून ग्राईंडरमध्ये मिक्स करून घ्या. नंतर हे ड्रिंक बनून तयार होईल. हे ड्रिंक सकाळी रोज रिकाम्या पोटी प्या. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वेगानं वाढेल आणि  वजन कमी होण्यासही मदत होईल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य