Join us

पोट-मांड्या जाडजूड- कंबरही सुटली खूप? उपाशीपोटी 'ही' पानं चावून खा, झरझर होईल फॅटलॉस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 16:23 IST

Mango Leaves For Weight Loss : आंब्याची पानं पाण्यात उकळवून तुम्ही याचे पाणी पिऊ शकता.

उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना आंबे खायला खूप आवडतात. वर्षभर आंबे खावेत अशी अनेकांची इच्छा असते. तब्येतीच्या दृष्टीने आंब्याची पानही फायदेशीर ठरतात. आंब्याच्या पानांमध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात.(Mango Leaves For Weight Loss) यात एंटी ऑक्सिडेंट्स, फायाटोन्युट्रिएंट्स, अल्कलॉईड, बीटा-कॅरोटीन, फ्लेवोनोईड्स, व्हिटामीन ए, व्हिटामीन बीआणि व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्या टाळता येतात. (Chewing Mango Leaves Empty Stomach In The Morning For Weight Loss)

मिडीसिननेट.कॉमच्या रिपोर्टनुसार आंब्याच्या पानांमध्ये मँगिफेरिन अर्क असतो. जे एडिपोनेक्टीनचा उत्तर स्तर सक्रिय करण्यास मदत करते. एडिपोनेक्टीन एक पेशी प्रथिनं आहे जे शरीरातील चयापचन आणि साखर नियमनात महत्वाची भूमिका बजावते (Ref). प्राण्यांवर केलेल्या संशोधनातून दिसून आले की आंब्याच्या पानांचा अर्क ऊतींच्या पेशींमध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करतो. ज्यामुळे लठ्ठपणा, डायबिटीस आणि मेटाॉलिझ्म सिंड्रोम कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होते. आंब्याच्या पानांच्या अर्कामध्ये मॅंगिफेरिन असते, जे अॅडिपोनेक्टिनचे उच्च स्तर सक्रिय करण्यास मदत करते. अॅडिपोनेक्टिन हे एक पेशी सिग्नलिंग प्रोटीन आहे जे शरीरातील चरबी चयापचय आणि साखर नियमनात भूमिका बजावते.

वजन कमी होण्यास मदत

जर तुम्ही नियमित आंब्याच्या पानांचा चहा प्यायलात तर यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कारण हे एक नॅच्युरल मेटाबॉलिझ्म बुस्टर आहे.

हृदयासाठी फायदेशीर

आंब्याची पानं खाल्ल्यानं बीपी, कोलेस्टेरॉल आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. हृदय विकाराच्या रुग्णांसाठी आंब्याची पानं खाणं फायदेशीर ठरतं.

संक्रमण होत नाही

आंब्याच्या पानांमधील औषधी गुण व्हिटामीन्स, इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात. ज्यामुळे शरीराला संक्रमणापासून वाचवता येते.

आंब्याची पानं कशी खावीत?  (How To Eat Mango Leaves)

आंब्याची पानं पाण्यात उकळवून तुम्ही याचे पाणी पिऊ शकता. यासाठी २ ते ३ आंब्याची पानं व्यवस्थित धुवून नंतर पाण्यात उकळवून गाळून चहा पिऊ शकता किंवा सकाळी आंब्याची पानं स्वच्छ धुवून याचे सेवन करा. जर तुम्हाला असंच खायला आवडत नसेल तर तुम्ही पाण्यात उकळवून याचे सेवन करू शकता.

टॅग्स : वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स