Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > छोट्याशा सवयीमुळे वाढू शकतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; जाणून घ्या, हेअर डाय, स्ट्रेटनरबाबतचं 'सत्य'

छोट्याशा सवयीमुळे वाढू शकतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; जाणून घ्या, हेअर डाय, स्ट्रेटनरबाबतचं 'सत्य'

केसांना सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी हेअर डाय आणि स्ट्रेटनरचा वापर सर्रास केला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:41 IST2024-12-18T16:40:24+5:302024-12-18T16:41:43+5:30

केसांना सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी हेअर डाय आणि स्ट्रेटनरचा वापर सर्रास केला जातो.

chemicals present in hair dyes and straighteners can increase risk of breast cancer | छोट्याशा सवयीमुळे वाढू शकतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; जाणून घ्या, हेअर डाय, स्ट्रेटनरबाबतचं 'सत्य'

छोट्याशा सवयीमुळे वाढू शकतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; जाणून घ्या, हेअर डाय, स्ट्रेटनरबाबतचं 'सत्य'

नटायला आणि आणखी छान दिसायला प्रत्येकालाच आवडतं. केसांना सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी हेअर डाय आणि स्ट्रेटनरचा वापर सर्रास केला जातो. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? हेअर डाय आणि केमिकल स्ट्रेटनरचा जास्त वापर केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो, असं रिसर्चमधून समोर आलं आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सायन्सेसच्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, हेअर डाय आणि स्ट्रेटनरमध्ये असलेल्या केमिकल्समुळे शरीरात हार्मोनल बदल होऊ शकतात, ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. संशोधनानुसार, नियमितपणे हेअर डाय वापरणाऱ्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ९% ते ६०% पर्यंत वाढतो. विशेषतः गडद रंगाच्या हेअर डायचा प्रभाव अधिक धोकादायक असू शकतो.

स्ट्रेटनरमध्ये धोकादायक केमिकल्स

स्ट्रेटनरमध्ये फॉर्मल्डिहाइड आणि पॅराबेन्स सारखी केमिकल्स देखील असतात, ज्यामुळे हार्मोनल इनबॅलेन्स होऊ शकतो. या केमिकल्सचा दीर्घकाळ वापर केल्याने शरीरातील विषारी घटकांची पातळी वाढते, ज्यामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ होऊ शकते.

ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे अन्य रिस्क फॅक्टर

- अनियमित जीवनशैली
- जंक फूड
- अति मद्य आणि तंबाखू
 - शरीरातील हार्मोनल बदल

अशी घ्या आरोग्याची काळजी 

- हेअर डाय आणि स्ट्रेटनरचा वापर कमी करा.
- नॅचरल आणि ऑर्गेनिक प्रोडक्टची निवड करा.
- केसांना रंग देण्यासाठी मेहंदी किंवा हर्बल डाय वापरा.
- नियमित आरोग्याची तपासणी करा.
- निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा 
- संतुलित आहार घ्या.

डॉक्टरांचं मत

केमिकलयुक्त पदार्थांच्या अतिवापरामुळे शरीरातील हार्मोन्सवर गंभीर परिणाम होतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका वाढतो. म्हणून, ग्रूमिंगसाठी नैसर्गिक आणि सुरक्षित पद्धत वापरा.
 

Web Title: chemicals present in hair dyes and straighteners can increase risk of breast cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.