Osteoporosis In Womens : दिवसाची सुरूवात होताच जास्तीत जास्त लोकांचा संबंध साबण, टूथपेस्ट, माउथवॉश या गोष्टींसोबत येतो. रोज सतत या गोष्टींचा वापर केला जातो. महिला तर दिवसभर वेगवेगळ्या कामात गुंतलेल्या असतात. कधी भांडी घासताना, कधी कपडे धुताना तर कधी आंघोळ करताना या गोष्टींचा वापर करतात. पण या गोष्टीही आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात याचा कुणी विचारही करत नाहीत. एका रिसर्चनुसार, महिलांना या वस्तुंच्या वापराने महिलांना ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis) होण्याचा धोका वाढतो.
Telegraph वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, महिलांना या वस्तुंपासून ऑस्टिओपोरोसिस आजाराचा धोका असण्याचं कारण या वस्तुंमधील ट्रायक्लोसॅन केमिकल आहे. तसा महिलांना कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका असतो, पण रिसर्चमधून समोर आलं आहे की, ज्या महिला अॅंटी-बॅक्टेरिअल साबण, टूथपेस्ट किंवा पर्सनल केअर प्रॉडक्टचा वापर करतात, त्यांना या आजाराचा धोका अधिक असतो.
चीनच्या एका मेडिकल कॉलेजमधील यिनजुंग ली सांगतात की, लेबॉरेटरीतील अभ्यासातून हे समोर आलं की, ट्रायक्लोसॅनने प्राण्यांच्या बोन मिनरल डेंसिटीवर फार वाईट प्रभाव पडतो. पण ट्रायक्लोसॅन आणि मनुष्यांच्या हाडांमध्ये काय संबंध आहे. याबाबत खूप काही समोर आलं नाही. पण ज्या महिलांच्या यूरिनमध्ये ट्रायक्लोसॅनचं प्रमाण अधिक असतं, त्यांच्यात हाडांशी संबंधित समस्या अधिक बघायला मिळतात.
काही रिसर्चमधून असंही समोर आलं आहे की, ट्रायक्लोसॅन थायरॉइड आणि रिप्रॉडक्टिव सिस्टीमला सुद्धा प्रभावित करतं. पण ट्रायक्लोसॅन ऑस्टोयोपोरोसिससाठी थेट जबाबदार असतं. हे सिद्ध करण्यासाठी आणखी रिसर्च करण्याची गरज आहे. पण योग्य काळजी घेतली गेली तर यापासून बचाव केला जाऊ शकतो. प्रॉडक्ट खरेदी करताना लेबल्स जरूर वाचावे आणि प्रयत्न करा की, ट्रायक्लोसॅन असलेले साबण, टूथपेस्ट आणि माउथवॉश वापरू नये.