एखाद्या सरबतात घालण्यासाठी किंवा एखादा पदार्थ गार ठेवण्यासाठी त्यात बर्फ वापरला जातो. बर्फ घशासाठी चांगला नाही तसेच त्याचा शरीराला तसा काही फार फायदा नसतो. मात्र बर्फाचे इतर काही मस्त फायदे असतात. जे दैनंदिन जीवनात कामी येतात.
१. त्वचेच्या निगेबद्दल बोलायचे झाल्यास बर्फ हा उत्तम नैसर्गिक स्किन कूलंट मानला जातो. चेहर्यावर हलक्या हाताने बर्फ फिरवल्याने त्वचा तरोताजी होते, लालसरपणा आणि पिंपल्स कमी होतात. चेहर्यावरील सूज यावर बर्फ त्वरित आराम देतो. (Check out 5 uses of ice, a gentle touch for skin, muscle relaxation and other uses )रक्तप्रवाह तात्पुरता मंदावल्यामुळे रोमछिद्रे आकुंचन पावून चेहऱ्याला एकसारखे रुप मिळते. मेकअप करण्याच्या आधी चेहरा बर्फाने साफ केल्यास मेकअपचा त्रास होणार नाही.
२. एखादी जखम, खरचटणे किंवा आकडी यांसारख्या स्थितीत बर्फाची “प्रथमोपचार” म्हणून सर्वाधिक गरज भासते. दुपारी उन्हामुळे जर चक्कर येत असेल किंवा काही त्रास झाला तर अशावेळी बर्फ फिरवल्याने आराम मिळतो. जखमेच्या वर नाही तर आवतीभोवती बर्फ फिरवल्याने जखम कमी होते. तसेच दुखापत कमी होते.
३. सूज आली असेल, मार लागला असेल किंवा एखाद्या भागात अचानक दाह जाणवत असेल तर बर्फ हा सर्वात जलद दिलासा देणारा उपाय आहे. थंड उपचारामुळे त्या भागातील रक्तप्रवाह कमी होतो आणि द्रव साचण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे हात, पाय, डोळ्याखालील सूज, पाय सूजणे, ढोपराला बरेच तास बसून राहिल्यामुळे वेदना होणे अशा त्रासातही काही मिनिटे बर्फ लावल्यास आराम मिळतो.
४. स्नायूंचा ताण, मसल स्पॅझम, थकवा, लांब वेळ उभे राहिल्याने किंवा चालल्याने होणारा त्रास या सर्व त्रासांत बर्फ स्नायूंना थंडावा देऊन ताण कमी करतो. गरम-थंड थेरपींच्या जोडीतही बर्फाची भूमिका महत्त्वाची असते. व्यायामानंतर स्नायूंना आराम देण्यासाठी किंवा वारंवार होणाऱ्या गुडघेदुखीसारख्या तक्रारींवर डॉक्टरही अनेकदा बर्फ लावण्याचा सल्ला देतात.
५. पदार्थ जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी आजूबाजूला बर्फ ठेवला तर फायदा होतो. तसेच बर्फ चेहऱ्यावर तसेच हाता पायाला चोळल्याने घामाचा वासही जातो. असे काही साधे उपयोग बर्फाचे असतात. बर्फ खाणे टाळायलाच हवे मात्र त्याचा वापर असाही करता येतो.
