Join us
Daily Top 2 Weekly Top 5

चपाती की भात रात्री जेवणात काय खावं? न्यूट्रिशनिस्टने सांगितलं काय खाल तर येईल चांगली झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 11:37 IST

Roti or Rice in Dinner: खूप लोक रात्री जेवणात चपाती खातात, पण न्यूट्रिशनिस्टच्या मते रात्री चपातीपेक्षा भात खाणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. कारण जाणून घेऊया.

Roti or Rice in Dinner: आपण नेहमी ऐकतो की रात्रीचं जेवण हलकं आणि कमी प्रमाणात करावं. भारतात जास्तीत जास्त लोक दोन्ही वेळच्या मुख्य जेवणात चपाती किंवा भात खातात, त्यामुळे मोठा प्रश्न असा पडतो की, डिनरमध्ये चपाती खावी की भात? न्यूट्रिशनिस्ट शालिनी सुधाकर यांनी या विषयावर महत्त्वाची माहिती दिली आहे.

न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात?

खूप लोक रात्री जेवणात चपाती खातात, पण न्यूट्रिशनिस्टच्या मते रात्री चपातीपेक्षा भात खाणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. कारण जाणून घेऊया.

रात्री भात खाणे कसे फायदेशीर?

पचायला अधिक सोपा

चपाती व भात दोन्हीत कॅलरी आणि कार्बोहायड्रेट जवळपास सारखेच असतात. फरक इतकाच की चपातीमध्ये ग्लूटन असतं तर भात नेहमी ग्लूटेन-फ्री असतो. ग्लूटेन एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे, जे पचायला वेळ घेतं. रात्री पचनशक्ती स्लो झालेली असते, त्यामुळे चपाती पचायला जास्त वेळ लागतो. उलट भात लवकर आणि सहज पचतो, त्यामुळे रात्री भात खाणं शरीरावर कमी ताण आणतं.

पचन चांगले असेल तर झोपही चांगली

भात हलका असल्याने त्याने पोटावर भार पडत नाही. यामुळे शरीर रिलॅक्स होतं आणि झोप चांगली लागते. तसेच भाताचा GI जास्त असतो. भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) चपातीपेक्षा जास्त असतो, त्यामुळे भात खाल्ल्यावर ब्लड शुगर वेगानं वाढू शकते. म्हणून डायबेटिसच्या रुग्णांनी किंवा ज्यांची शुगर वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी भात कमी खावा.

भात खाणार असाल तर 'हा' उपाय करा

भात एकटाच खाऊ नका. त्यासोबत काही गोष्टी खाल्ल्यानं शुगर अचानक वाढत नाही. डाळ, हिरव्या भाज्या, दही किंवा दलिया यामुळे प्रोटीन आणि फायबर मिळतं आणि जेवण संतुलित होतं

English
हिंदी सारांश
Web Title : Roti or rice for dinner? Nutritionist reveals best choice for sleep.

Web Summary : For better sleep, nutritionist Shalini Sudhakar suggests rice over roti at dinner. Rice is easier to digest due to being gluten-free, promoting relaxation and better sleep. However, diabetics should consume rice in moderation with fiber and protein.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य