Heart Disease Causes : हृदयासंबंधी आजार अलिकडे खूप जास्त वाढले आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात हृदयरोग चिंतेचा विषय आहे. मात्र, अनेकांना अजूनही हे माहीत नाही की, हृदयरोग आपल्याकडूनच रोज केल्या जाणाऱ्या चुकांमुळे होऊ शकतात. जर वेळीच या सवयी बदलल्या नाहीत तर शरीरात हाय कोलेस्टेरॉल तर वाढेलच, सोबतच इतरही अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. अशात या कोणत्या सवयी आहेत ज्या आपण वेळीच बदलायला हव्यात त्या पाहुयात.
स्मोकिंग आणि ड्रिंकिंग
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, स्मोकिंग आणि ड्रिंकिंगची सवय हृदयासाठी तर घातक आहेच, सोबतच शरीराच्या एकंदर आरोग्यावरही परिणाम करते. जर कोलेस्टेरॉल वाढू द्यायचं नसेल स्मोकिंग आणि ड्रिंकिंग लगेच बंद केली पाहिजे. त्याशिवाय फार जास्त तणाव घेणंही बंद केलं पाहिजे. जास्त तणावामुळे हृदयासंबंधी आजारांचा धोका अधिक वाढतो.
प्रोसेस्ड खाण्याची सवय
आजकाल भरपूर लोक प्रोसेस्ड फूड खातात. चवीला भलेही ते चांगले लागत असतील पण यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो. प्रोसेस्ड फूड खाण्याच्या सवयीमुळे शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वेगानं वाढतं. जर आपणही नेहमीच हे फूड्स खात असाल तर खाणं बंद केलं पाहिजे. चिप्स, बिस्कीट, नूडल्स, फ्रोजन फूड्स आणि हाय सोडिअम असलेले फूड्स पूर्णपणे बंद केले पाहिजे.
फिजिकल अॅक्टिविटी न करणं
जास्त वेळ एकाच जागी बसून काम करणारे लोक व्यायाम करण्यासाठी वेळ काढू शकत नाहीत. फिजिकल अॅक्टिविटीची कमतरता हे कोलेस्टेरॉल वाढण्याचं एक मुख्य कारण आहे. तसेच रोज पुरेशी झोप घेत नसाल तरीही बॅड कोलेस्टेरॉल खूप जास्त वाढतं. झोप कमी होत असेल तर हृदयरोगांचा धोकाही वाढू शकतो. इतकंच नाही तर शुगर असलेले पदार्थही कमी खाल्ले पाहिजेत. जेणेकरून हृदयरोगांचा धोका टाळता येईल.