Join us
Daily Top 2 Weekly Top 5

रात्री पुन्हा पुन्हा लघवी लागते, झोपमोड होते? पाहा रात्री किती वेळ लघवीला जाणं नॉर्मल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 18:59 IST

Frequent Peeing in the Middle of the Night: वाढत्या वयामुळे, प्रोस्टेट किंवा कमजोर ब्लॅडरमुळे असं होत असेल. मात्र, प्रसिद्ध डॉक्टर एरिक बर्ग सांगतात की, प्रत्येकवेळी हीच कारणं असणं गरजेचं नाही.

How to Stop Peeing in the Middle of the Night: रात्री लघवी लागणं ही बाब तशी कॉमन आहे. पण रोज रात्री जास्त वेळ लघवीला जावं लागत असेल, ही बाब सामान्य नाही. याबाबत बऱ्याच लोकांना असं वाटतं की, वाढत्या वयामुळे, प्रोस्टेट किंवा कमजोर ब्लॅडरमुळे असं होत असेल. मात्र, प्रसिद्ध डॉक्टर एरिक बर्ग सांगतात की, प्रत्येकवेळी हीच कारणं असणं गरजेचं नाही. डॉक्टर बर्ग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. चला पाहुयात काय आहे त्यांचं मत...

रात्री किती वेळा लघवी येणं सामान्य?

याबाबत डॉक्टर बर्ग सांगतात की, रात्री एकदा लघवीसाठी झोपेतून उठणं सामान्य आहे. पण जर रोज आपण २ पेक्षा जास्त वेळ लघवीला जात असाल तर ही बाब झोप आणि एकंदर आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. असं झाल्यास झोप पूर्ण होत नाही, थकवा जाणवतो. पुढे जाऊन डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि वजन वाढण्याचा धोकाही असतो.

पुन्हा पुन्हा लघवी का येते?

डॉक्टर एरिक बर्ग सांगतात की, रात्री पुन्हा पुन्हा लघवी येण्याचं एक मोठं कारण अॅंटी-डाययूरेटिक हार्मोन आहे. हे हार्मोन रात्री लघवीचं प्रमाण कंट्रोल करतात. जर हे योग्यपणे काम करत नसतील, तर रात्री लघवी जास्त तयार होते. आता हे हार्मोन योग्यपणे काम न करण्यामागे काही कारणं असू शकतात. अॅंटी-डाययूरेटिक हार्मोन योग्यपणे आपलं काम करत नसल्याची काही कारणं खालीलप्रमाणे सांगता येतील.

शरीरात जास्त मीठ आणि कमी पोटॅशिअम असणं

ब्लड शुगर वाढणं

सायंकाळी जास्त पाणी पिणे

अल्कोहोल किंवा कॅफीनचं अधिक सेवन

रात्री जास्त गोड पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट घेणं

रात्रीच्या जेवणात जास्त प्रोटीन घेणं

पायांमध्ये सूज हाही एक संकेत

जर आपले पाय किंवा टाचांवर सूज राहत असेल, पायाची त्वचा दाबल्यावर खट्टा पडत असेल, तर याचा अर्थ शरीरात पाणी जमा झालं आहे. जेव्हा आपण रात्री झोपतो, तेव्हा पाणी रक्तात परत येतं आणि मग किडनीच्या माध्यमातून लघवी बनून बाहेर पडतं.

काय कराल उपाय?

डॉक्टर सांगतात की, ही समस्या बरीच कमी केली जाऊ शकते. त्यासाठी रोजच्या काही कॉमन सवयी बदलाव्या लागतील.

झोपण्याच्या २ तास आधी पाणी पिणं बंद करा

सायंकाळी अल्कोहोल किंवा कॅफीन घेऊ नका

रात्री स्नॅक्स खाऊ नका

गोड, मसालेदार किंवा जास्त प्रोटीन घेऊ नका

रात्री हलकं जेवण करा

डॉक्टर सांगतात की, अनेक केसेसमध्ये रात्री पुन्हा पुन्हा लघवी लागणं केवळ ब्लॅडरची समस्या नसते. तर ही समस्या शरीरात सुरू असलेल्या गडबडीचा संकेत असू शकते. योग्य आहार, योग्य प्रमाणात पाणी पिणे आणि चांगली लाइफस्टाईल फॉलो करून ही समस्या बरीच कमी केली जाऊ शकते. जर समस्या अधिक असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Frequent Nighttime Urination: Causes, Normal Frequency, and Solutions Explained

Web Summary : Waking up once nightly to urinate is normal. More often indicates potential health issues. Dr. Berg highlights causes like diet, hormones, and fluid intake. Simple lifestyle changes can help reduce frequent nighttime urination and improve sleep quality.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य