Instant sleep tips : रोज रात्री चांगली झोप घेणं आपल्या तब्येतीसाठी खूप महत्वाची असते. पण जर रोज झोप येत नसेल तर हे आजारपणाचं एक लक्षण आहे. यामुळे शरीर दिवसभर थकलेलं, सुस्त वाटतं आणि माणूस लवकर वृद्ध होऊ लागतो. झोप न येण्याची अनेक कारणं असू शकतात, त्यातलं सगळ्यात मोठं कारण म्हणजे रोजचं बिघडलेलं रूटीन. बदलत्या आणि बिझी लाइफस्टाईलमुळे लोकांना आपला थकवा घालवता येत नाही. दिवसभर कष्ट करूनही अस्वस्थतेमुळे गाढ झोप येत नाही आणि त्यामुळे शरीर अनेक आजारांनी वेढलं जातं. जर एखाद्याला झोप न येण्याची समस्या असेल तर शरीराच्या काही खास बिंदूंवर दाब दिल्याने गाढ झोप लागू शकते.
कोणते बिंदू दाबल्याने झोप चांगली लागते?
झोप यावी यासाठी शरीराच्या काही ठराविक भागांवर दाब देण्याच्या प्रक्रियेला अॅक्युप्रेशर म्हणतात. ही एक प्राचीन चिनी उपचार पद्धत आहे, ज्यामध्ये शरीराच्या विशिष्ट बिंदूंना दाब देऊन आराम आणि झोप मिळवता येते. खाली दिलेले ४ प्रेशर पॉइंट्स झोप आणण्यासाठी उपयोगी आहेत.
कानामागचा भाग
जर चिंता किंवा डोकेदुखीमुळे झोप लागत नसेल, तर कानाच्या मागील भागावर हलक्या हाताने १० ते २० वेळा दाब द्या. या बिंदूला 'अनमियन' म्हणतात. हे बिंदू झोप लवकर आणण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
भुवयांच्या मधला भाग
अनेकदा टेन्शन किंवा ब्लड प्रेशर वाढल्यामुळे झोप लागत नाही. अशा वेळी भुवयांच्या मधल्या भागावर हलका दाब द्या. हा बिंदू मानसिक शांतता वाढवतो आणि झोप लवकर आणण्यास मदत करतो.
मानेखालील भाग
मालिश करताना जेव्हा मानेवर हलके हात फिरवले जातात, तेव्हा झोप यायला लागते. कारण मानेच्या वरच्या भागात एक विशेष बिंदू असतो. अंगठ्याने हलका दाब दिल्यास लगेच आराम मिळतो आणि झोप येऊ लागते. हा बिंदू रिलॅक्सेशन पॉइंट म्हणून ओळखला जातो.
हातावरील बिंदू
हाताच्या बोटांमध्येही झोप आणणारे पॉइंट्स असतात. बोटांपासून मनगटापर्यंत हळुवार दाब द्या. यामुळे नर्व्ह सिस्टीमला आराम मिळतो आणि शरीर शांत होऊन झोप लागते.
ह्या एक्युप्रेशर बिंदूंचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि नियमित दिनचर्येसोबत केल्यास, झोप न येण्याची समस्या हळूहळू कमी होऊ शकते.
