Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उन्हाळ्यात तोंड सतत कोरडे पडते- तहान लागते? शरीर देत ५ सायलेंट सिग्नल - शरीरातील छोटे बदलही ठरू शकतात आजाराच कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2026 13:08 IST

Home remedies for dry mouth in Marathi: Warning signs of body in summer heat: तोंड वारंवार कोरडे का पडते आणि आपले शरीर आपल्याला नेमके काय होते पाहूया.

उन्हाळ्यात आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे आपल्या सतत तहान लागते आणि ही एक साधी नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण जर भरपूर पाणी पिऊनही आपले तोंड सतत कोरडे पडत असेल तर याकडे फक्त उष्णता म्हणून दुर्लक्ष करणं आपल्याला महागात पडू शकते.(Home remedies for dry mouth in Marathi) कडक ऊन आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आपल्याला जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण या उष्णतेमुळे दुपारी बाहेर जाणे तर दूरच, घरात बसल्यानेही घाम येतो.(Warning signs of body in summer heat) अशावेळी घसा कोरडा पडणे, तहान लागणे हे खूप सामान्य आहे. पण पाणी प्यायल्यावर काही वेळाने आपले तोंड पुन्हा कोरडे पडू लागते. (Health tips for summer dehydration) आपले शरीर काही छोटे छोटे 'सायलेंट सिग्नल' देत असते. उन्हाळ्यात घाम जास्त येतो, त्यामुळे डिहायड्रेशन होते परंतु तोंड कोरडे पडण्यासोबतच जर आपल्याला थकवा, डोकेदुखी किंवा लघवीला जळजळ होणे असे त्रास जाणवत असतील, तर ते शरीरातील बिघडलेल्या संतुलनाचे लक्षण आहे.(Mouth dryness symptoms and prevention) तोंड वारंवार कोरडे का पडते आणि आपले शरीर आपल्याला नेमके काय होते पाहूया. 

सावळ्या मुलींना खुलून दिसतात ९ रंग, सुंदर कातील दीपिका पादुकोणसारखा लूक!

1. जेव्हा शरीरातील पाणी आणि क्षारांचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त कमी होते, तेव्हा शरीर सर्वात आधी तोंड कोरडे करुन पाण्याचा साठा वाचवण्याचे काम करते. जर आपले तोंड सतत कोरडे होत असेल आणि चक्कर येत असेल तर डिहायड्रेशनची समस्या आहे. 

2. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास तोंड वारंवार कोरडे पडते आणि सतत तहान लागते. जर रात्रीच्या वेळी आपले तोंड जास्त सुकत असेल, तर रक्तातील साखरेची पातळी चेक करा. 

3. शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यास जिभेला कोरडेपणा येतो आणि तोंडात उष्णतेमुळे जळजळ होते. तोंड सुकण्यासोबतच जर जिभेवर पांढरा थर साचत असेल तर हे पोषक तत्वांच्या अभावाचे लक्षण आहे. 

4. अनेकदा शरीरात उष्णता वाढल्यामुळे किंवा पित्ताचा त्रास वाढल्यामुळेही तोंड कोरडे पडते. अन्नाचे नीट पचन न झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि तोंड सुकल्यासारखे वाटते. 

5. आपण बीपी, ॲलर्जी किंवा इतर प्रकारचे औषधे घेत असू तर त्याचे दुष्परिणाम म्हणूनही तोंड कोरडे पडू शकते. उन्हाळ्यात या औषधांचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवतो. 

6. उन्हाळ्यात साधे पाणी न पिता पाण्यात थोडे मीठ आणि साखर घालून प्या. यामुळे शरीरातील क्षारांचे संतुलन टिकून राहते. उन्हाळ्यात ताळ, शहाळे आणि लिंबू पाण्याचा आहारात समावेश करा. हे शरीराला हायड्रेट ठेवते. 

7. आहारात पाणी जास्त असलेल्या फळांचा समावेश करा. यामुळे तोंडातील लाळ ग्रंथी सक्रिय राहतात.चहा आणि कॉफीचा अतिवापर टाळा, कारण यामुळे लघवीचे प्रमाण वाढते आणि शरीर अधिक कोरडे पडते. भरपूर पाणी पिऊनही तुमचे तोंड अनेक दिवस कोरडे राहत असेल, आपल्याला चघळायला किंवा गिळायला त्रास होत असेल किंवा तोंडात फोड येत असतील, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.   

English
हिंदी सारांश
Web Title : Dry Mouth in Summer? 5 Silent Signals Your Body Sends.

Web Summary : Persistent dry mouth despite drinking water can signal dehydration, diabetes, or vitamin deficiency. Other causes include increased body heat, medications, and inadequate diet. Consume water-rich fruits and consult a doctor if symptoms persist.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्ससमर स्पेशलहोम रेमेडी