Join us

सावधान! मांजरींमुळे वेगाने पसरू शकतो 'बर्ड फ्लू', रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:19 IST

पाळीव मांजरींमुळे बर्ड फ्लू पसरू शकतो असा इशारा एका नवीन रिसर्चमध्ये देण्यात आला आहे.

तुम्हालाही मांजर पाळण्याची आवड असेल तर काळजी घ्या. कारण पाळीव मांजरींमुळे बर्ड फ्लू पसरू शकतो असा इशारा एका नवीन रिसर्चमध्ये देण्यात आला आहे. अमेरिकेतील पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या अडीच वर्षांपासून याचा कहर पाहायला मिळत आहे. टेलर आणि फ्रान्सिस मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चमध्ये असं म्हटलं आहे की, मांजरी एक किंवा दोन म्यूटेशन व्हायरस स्ट्रेन हे माणसापर्यंत सहज पोहोचवण्यास मदत करतात. 

एव्हीयन इन्फ्लूएंझाचा घातक स्ट्रेन, जो अनेकदा H5N1 म्हणून ओळखला जातो, १०० मिलियनहून अधिक पक्ष्यांच्या मृत्यूचं कारण आहे. मात्र, तो माणसांमध्ये सहजासहजी पसरत नाही. पण तरी देखील त्याबाबत सतर्क राहायला हवं. एप्रिलमध्ये, साउथ डकोटामधील एका घरात १० मांजरींचा मृत्यू झाल्यानंतर, संशोधकांनी त्यांचं विश्लेषण केल्यानंतर त्यांच्यामध्ये श्वसन आणि मज्जातंतूशी संबंधित समस्या आढळल्या. 

मांजरींमध्ये आढळणारा व्हायरस सुमारे ८० किमी दूर असलेल्या डेअरी फार्मवरील प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या व्हायरससारखाच होता. मांजरींच्या मृतदेहाजवळ पक्ष्यांची पिसं आढळून आली, ज्यावरून असं दिसून येतं की, त्यांनी जंगली पक्षी खाल्ले असावेत, ज्यांनी व्हायरस आणला होता.

मांजरींना बर्ड फ्लूचा जास्त धोका?

रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, इतर प्राण्यांच्या तुलनेत मांजरींमध्ये दोन रिसेप्टर्स असतात, ज्याद्वारे बर्ड फ्लूचे व्हायरस आणि हंगामी फ्लू त्यांच्यात सहज प्रवेश करू शकतात. फ्लूचा सीझन जसजसा वाढत जातो तसतशी मांजरींना एकाच वेळी H5N1 आणि हंगामी फ्लूच्या व्हायरसची लागण होण्याची चिंता वाढत आहे. मांजरी माणसांच्या आसपास राहत असल्याने त्या बर्ड फ्लू पसरवू शकतात.

मांजरींपासून माणसांमध्ये कसा पसरतो व्हायरस?

रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की, संक्रमित मांजरींमध्ये सिस्टमॅटीक संक्रमण वाढतं. ते श्वसन आणि पाचक प्रणाली दोन्हीद्वारे व्हायरस पसरवतात, ज्यामुळे आमच्या किंवा तुमच्या संपर्कात येण्याचे अनेक मार्ग तयार होतात. मांजरींमुळे H5N1 व्हायरस माणसांमध्ये पसरल्याचा कोणताही पुरावा नसला तरी शास्त्रज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कारण असे झाले तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.  

टॅग्स : बर्ड फ्लूआरोग्यहेल्थ टिप्स