Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नखाच्या आजुबाजुची त्वचा कोरडी पडून सालं निघतात- रक्त येतं? पाहा यामागची कारणं आणि उपाय..

नखाच्या आजुबाजुची त्वचा कोरडी पडून सालं निघतात- रक्त येतं? पाहा यामागची कारणं आणि उपाय..

How To Prevent Skin Peeling Around Nail?: बऱ्याच जणांच्या बाबतीत असं दिसून येतं की नखाच्या आजुबाजुची त्वचा कोरडी पडून तिथून रक्त येतं. हा त्रास का होतो आणि त्यावर काय उपाय करावा ते पाहूया..(causes and remedies for skin peeling around nail)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2025 13:27 IST2025-04-29T13:26:25+5:302025-04-29T13:27:10+5:30

How To Prevent Skin Peeling Around Nail?: बऱ्याच जणांच्या बाबतीत असं दिसून येतं की नखाच्या आजुबाजुची त्वचा कोरडी पडून तिथून रक्त येतं. हा त्रास का होतो आणि त्यावर काय उपाय करावा ते पाहूया..(causes and remedies for skin peeling around nail)

casuse for peeling skin around nail, how to prevent skin peeling around nail, causes and remedies for skin peeling around nail | नखाच्या आजुबाजुची त्वचा कोरडी पडून सालं निघतात- रक्त येतं? पाहा यामागची कारणं आणि उपाय..

नखाच्या आजुबाजुची त्वचा कोरडी पडून सालं निघतात- रक्त येतं? पाहा यामागची कारणं आणि उपाय..

Highlightsनखाच्या आजुबाजुची त्वचा कोरडी पडून सालं का निघतात?

कधी कधी स्वयंपाक करताना हाताला तिखट- मीठ लागलं की नखाच्या आजुबाजुच्या त्वचेतून आग होऊ लागते. खूप सलू लागतं. मग पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्या भागातल्या त्वचेची सालं निघायला लागली असून त्यातून बारीकसं रक्त सुद्धा येत आहे. ते साल एवढं बारीक असतं की नेलकटरनेही कापून निघत नाही. बऱ्याचदा तर हाताने ओढूनच काढून टाकावं लागतं. असं करताना तर खूपच वेदना हाेतात (how to prevent skin peeling around nail?). लहान मुलांच्या बाबतीत तर हा त्रास जास्त दिसून येतो. त्यामुळेच हा त्रास वारंवार होऊ नये म्हणून त्यामागची कारणं जाणून घेऊया..(causes and remedies for skin peeling around nail)

 

नखाच्या आजुबाजुची त्वचा कोरडी पडून सालं निघू नये म्हणून काय करावे?

नखाच्या आजुबाजुची त्वचा कोरडी पडून सालं का निघतात याविषयी डॉ. अंकित बन्सल यांनी दिलेली माहिती हेल्थशॉटने प्रकाशित केली आहे. 

फक्त २ गोष्टी करा- कडिपत्त्याचं रोप होईल हिरवेगार- डेरेदार, इतर कोणत्याच खताची गरज नाही

१. यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ज्यांची त्वचा कोरडी असते, त्यांना हा त्रास हाेतो. शिवाय ऋतू बदलण्याचा जो काळ असतो, त्या काळात हा त्रास जास्त वाढतो. त्यामुळे ज्यांना वारंवार असा त्रास होतो, त्यांनी ऋतू बदलायच्या सुमारास त्वचेची थोडी जास्त काळजी घ्यावी. नखाच्या आजुबाजुला मॉईश्चरायझर, खोबरेल तेल, बदाम तेल, साजूक तूप लावून ती त्वचा अधिकाधिक हायड्रेटेड, मॉईश्चराईज राहिल याची काळजी घ्यावी.

 

२. शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्सची कमतरता असणे हे देखील यामागचं एक लक्षण आहे. त्यामुळे तुम्हालाही हा त्रास वारंवार होत असेल तर तुमच्याही आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिनयुक्त पदार्थ कमी प्रमाणात जात आहेत का हे एकदा तपासून पाहा. कॅल्शियमयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खायला सुरुवात करा.

घरातली नकारात्मकता कमी करणाऱ्या ३ गोष्टी, घरात पॉझिटीव्ह वाटण्यासाठी आठवड्यातून एकदा 'हे' कराच..

३. नखांची, हाताची योग्य पद्धतीने स्वच्छता होत नसेल तर त्यामुळेही जंतूसंसर्ग होऊन हा त्रास होऊ शकतो. किंवा तो कमी प्रमाणात असेल तर वाढू शकतो. त्यामुळे हाताची, नखांची स्वच्छता ठेवा. नखे वेळेवर कापा. नखांमध्ये घाण जमा होऊ देऊ नका, असा सल्लाही डाॅक्टर देतात. 

 

Web Title: casuse for peeling skin around nail, how to prevent skin peeling around nail, causes and remedies for skin peeling around nail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.