Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कार्ब की फॅट...तब्येतीसाठी जास्त घातक काय? संशोधनाचा महत्वाचा खुलासा-तुम्ही जे खाता त्यात..

कार्ब की फॅट...तब्येतीसाठी जास्त घातक काय? संशोधनाचा महत्वाचा खुलासा-तुम्ही जे खाता त्यात..

Healthy Food Tips : खरंच कार्बोहायड्रेटने आरोग्याचं नुकसान होतं का? म्हणजे शरीराचं वजन वाढण्यास आणि आरोग्यासंबंधी समस्या होण्यास कार्ब्स जबाबदार असतात? चला जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तरं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:25 IST2026-03-20T10:23:49+5:302026-03-20T12:25:59+5:30

Healthy Food Tips : खरंच कार्बोहायड्रेटने आरोग्याचं नुकसान होतं का? म्हणजे शरीराचं वजन वाढण्यास आणि आरोग्यासंबंधी समस्या होण्यास कार्ब्स जबाबदार असतात? चला जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तरं...

Carbs or fat...which is more harmful to health? Research reveals truth | कार्ब की फॅट...तब्येतीसाठी जास्त घातक काय? संशोधनाचा महत्वाचा खुलासा-तुम्ही जे खाता त्यात..

कार्ब की फॅट...तब्येतीसाठी जास्त घातक काय? संशोधनाचा महत्वाचा खुलासा-तुम्ही जे खाता त्यात..

Healthy Food Tips : आपला आहाराच आपलं शरीर निरोगी आणि फिट ठेवू शकतो. त्यामुळे आहार हेल्दी असणं फार महत्वाचं ठरतं. आपणही पाहिलं असेल की, डॉक्टर किंवा हेल्थ एक्सपर्ट नेहमीच हिरव्या पालेभाज्या आणि वेगवेगळी फळं खाण्याचा सल्ला देत असतात. अशात फिट राहण्यासाठी बरेच लोक आहारातून कार्ब्स गायब करताना बघायला मिळतात. पण खरंच कार्बोहायड्रेटने आरोग्याचं नुकसान होतं का? म्हणजे शरीराचं वजन वाढण्यास आणि आरोग्यासंबंधी समस्या होण्यास कार्ब्स जबाबदार असतात? चला जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तरं...

आहारतज्ज्ञ सांगतात की, आहाराबाबत बरेच लोक ऐकीव गोष्टींवर अधिक विश्वास ठेवतात. आहारातील कार्बोहायड्रेटच्या प्रमाणाबाबतही असंच काहीसं आहे. मुळात वेगवेगळ्या पोषक तत्वांसोबतच शरीराला कार्बोहायड्रेटची सुद्धा गरज असते. त्यामुळे ते आहारातून पूर्णपणे काढणं चुकीचं ठरेल. असं केल्यास शरीरात वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. इतकंच नाही तर आहारात कार्ब्स कमी असतील तर वेळेआधीच मृत्यूचा धोका वाढू शकतो. 

कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय?  

कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके शरीरासाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहेत. हे अन्नातील तीन प्रमुख मॅक्रोन्यूट्रिएंट्सपैकी  एक आहेत, जे शरीरात ग्लुकोजमध्ये रूपांतरित होऊन पेशी, उती आणि अवयवांना उर्जा पुरवतात. यामध्ये प्रामुख्याने साखर, स्टार्च आणि फायबर यांचा समावेश होतो.

कार्ब्सपेक्षा नुकसानकारक फॅट

कार्ब्स अधिक प्रमाणात असलेल्या आहाराला वजन वाढण्यासाठी, डायबिटीससाठी आणि हृदयरोगांसाठी कारणीभूत मानलं जातं. प्रत्यक्षात कार्बोहायड्रेट्स शरीराला ग्लुकोज देतात. पण ग्लुकोजचं प्रमाण जर जास्त झालं तर वेगवेगळ्या प्रकारे नुकसानकारक ठरू शकतं. 

जर्नल ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित एका संशोधनात दावा करण्यात आला आहे की, जे लोक लो-कार्बोहायड्रेट्स असलेला आहार अधिक घेतात, त्यांच्यात वेळेआधीच मृत्यूचा धोका वाढू शकतो. तर लो फॅट असलेले पदार्थ आपलं आयुष्य वाढवू शकतात. 

काय सांगतं संशोधन?

या संशोधनात चीन - अमेरिकेच्या विश्वविद्यालयातील संशोधकांच्या टिमने ५० ते ७१ वयोगटातील ३७१,१५९ लोकांना सहभागी करून घेतलं होतं. २३ वर्ष या लोकांचा फॉलोअप घेण्यात आला. ज्यादरम्यान यातील १६५,६९८ लोकांचा मृत्यू झाला. संशोधकांना असं आढळलं की, ज्या सहभागी लोकांच्या आहारात कार्ब्सचं प्रमाण फार कमी होतं, त्यांच्या मृत्यू दर ३८ टक्के वाढलेला आढळला. तेच लो - फॅट असलेला आहार घेतल्याने वेळेआधीच मृत्यूचा धोका ३४ टक्के कमी झालेला दिसला.

संशोधकांचं मत आहे की, आवश्यक कार्ब्सचं सेवन करणाऱ्या लोकांच्या तुलनेत कीटो सारखी डाएट फॉलो करणाऱ्यांमध्ये कोणत्याही कारणाने मृत्यूचा धोका २८ टक्के अधिक आढळला. संशोधक सांगतात की, आमच्या संशोधनातील निष्कर्ष हे दर्शवतात की, मध्यम वयोगट आणि वृद्ध लोकांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू दर रोखण्यात लो - फॅट डाएटसोबतच आहारातून सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण कमी करून फायदा मिळू शकतो.

हाय फॅट गोष्टी कमी करा

संशोधनातील निष्कर्षातून समोर आलं की, हेल्दी लो-फॅट डाएट फॉलो केल्याने मृत्यू दर १८ टक्के, कार्डिओवस्कुलर आजारांमुळे मृत्यू दर १६ टक्के आणि कॅन्सरमुळे मृत्यू दर १८ टक्क्यांनी केला जाऊ शकतो. आहारात कार्ब्सचं संतुलित प्रमाण असणं गरजेचं आहे. पण जास्त प्रमाणामुळे आजारांचा धोका असतो. कार्ब्स असलेल्या पदार्थांच्या तुलनेत फॅट जास्त नुकसानकारक आढळून आलं.

Web Title : कार्ब्स या फैट: सेहत के लिए ज़्यादा हानिकारक क्या? खुलासा

Web Summary : शोध से पता चला है कि कम वसा वाले आहार जीवनकाल बढ़ा सकते हैं, कम कार्ब वाले नहीं। उच्च वसा सेवन से मृत्यु दर बढ़ती है, जबकि संतुलित कार्ब्स ऊर्जा और स्वास्थ्य के लिए ज़रूरी हैं। संतृप्त वसा कम करना फायदेमंद है।

Web Title : Carbs or Fat: Which is More Harmful? Research Reveals All

Web Summary : Research suggests low-fat diets, not low-carb, may increase lifespan. High-fat intake is linked to higher mortality rates, while balanced carbs are essential for energy and health. Reducing saturated fats proves beneficial.