कॅन्सर होण्याचं प्रमाण आता वाढत चाललं आहे. आरोग्य तज्ज्ञांनी तरुणांमध्ये कॅन्सरचं प्रमाण झपाट्याने वाढत असल्याच्या चिंताजनक ट्रेंडकडे लक्ष वेधलं आहे. खराब जीवनशैली, ताणतणाव, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि विषारी घटकांचा संपर्क ही त्याची मुख्य कारणं मानली जातात.
होलिस्टिक हेल्थ एक्सपर्ट डॉ. ताज यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये ही समस्या अधोरेखित केली. ते म्हणाले की, तरुणांमध्ये कॅन्सरच्या वाढत्या घटनांमागील सर्वात मोठं कारण म्हणजे खराब जीवनशैली. चुकीचा आहार, ताणतणाव, शारीरिक व्यायामाचा अभाव आणि विषारी पदार्थांच्या संपर्कामुळे शरीरात जळजळ, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि हार्मोनल असंतुलन निर्माण होतं, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. या ट्रेंडपासून वाचण्यासाठी लोकांना त्यांची जीवनशैली बदलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कॅन्सरचा धोका वाढवणाऱ्या सवयी
खाण्याच्या चुकीच्या सवयी
प्रोसेस्ड फूड, जास्त साखर आणि अनहेल्दी फॅटचं सेवन केल्याने शरीरात जळजळ आणि लठ्ठपणा वाढतो. यामुळे कोलन, ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो.
धूम्रपान आणि मद्यपान
सिगारेटमध्ये असलेले कार्सिनोजेन्स डीएनएला नुकसान करतं, ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. त्याच वेळी जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने लिव्हर आणि एसोफेगल कॅन्सरचा होण्याचा धोका वाढतो.
ताणतणाव आणि झोपेचा अभाव
सततच्या ताणामुळे कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.
सनस्क्रीन न वापरणं
सूर्यकिरणांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने स्कीन कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
विषारी पदार्थ
प्लास्टिक, कीटकनाशकं आणि प्रोसेस्ड फूडमध्ये असलेले केमिकल्स शरीरात विषारी घटक वाढवतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो.
कॅन्सरपासून असा करा बचाव
निरोगी आहार - ताजी फळं, भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
ताण कमी करा - योग, मेडिटेशन आणि दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा.
शारीरिक हालचाल - नियमित व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि जळजळ कमी होते.
चांगली झोप - दररोज ७-९ तासांची झोप घ्या.
विषारी पदार्थ टाळा - केमिकल्स असलेल्या उत्पादनांऐवजी नैसर्गिक घटक असलेल्या पदार्थांचा वापर करा आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा.