Join us
Daily Top 2 Weekly Top 5

किचनमध्ये रोज वापरल्या जाणाऱ्या 'या' भांड्यांमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका; लगेच या वस्तू फेका, तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:48 IST

Cancer Causing Utensils : जर तुमच्या घरातील नॉन स्टिक तव्यावर ओरखडे पडलले असतील तर तो त्वरीत बदलणं गरजेचं आहे.

जेवताना बरेच लोक चवीकडे लक्ष देतात पण ते जेवण कोणत्या भांड्यात शिजत आहे, ती भांडी तब्येतीसाठी चांगली आहेत की नाही याकडे लक्ष दिलं जात नाही (Cancer Causing Utensils). अधुनिक विज्ञानातील संशोधनानुसार स्वंयपाकघरातील काही विशिष्ट प्रकारची भांडी कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढवू शकतात. अन्न शिजवण्यासाठी तसंच ताटात अन्न वाढताना तुम्ही कोणत्या धातूच्या भांड्यांचा वापर करता हे फार महत्वाचे असते. (Utensils used daily In the kitchen Can cause cancer Experts Advice)

नॉन स्टिक कोटिंगची भांडी

नॉन स्टिक पॅनमध्ये जेवण चिकटू नये यासाठी टेफ्लॉनचे कोटींग असते. पूर्वी ही भांडी बनवण्यासाठी पीएफओए म्हणजेच परफ्लोरोक्टॅनिक एसिड वापरलं जायचं. संशोधनानमुसार जेव्हा  ही भांडी उच्च तापमानावर तापवली जातात तेव्हा त्यातून विषारी घटक बाहेर निघतात. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरनुसार यामुळे किडनी आणि टेस्टिक्युलर कॅन्सरचा धोका संभवतो. जरी आता ही भांडी पीएफओएमुक्त मिळत असली तरी खराब झालेले किंवा ओरखडे पडलेले नॉन स्टिक वापरणे आरोग्यासाठी घातक आहे. (Ref)

 एल्युमिनियमची भांडी

भारतीय घरांमध्ये एल्युमिनियमची भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. मात्र यात आम्लयुक्त पदार्थ शिजवल्यास एल्युमिनियम अन्नात विरघळते. शरीरातल एल्युमिनियमचे प्रमाण वाढल्यास ते केवळ मेंदूच्या आरोग्यावर परिणाम करत नाही तर पेशींच्या डिएनए रचनेत बदल करून कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरते.

प्लॅस्टिकची भांडी आणि कंटेनर्स

अनेकजण गरम अन्न आणि प्लास्टीकच्या डब्यात ठेवतात किंवा मायक्रोव्हेव्हमध्ये प्लास्टीकची भांडी वापरतात. प्लॅस्टिकमध्ये बीपीए असते. ही रसायनं अन्नावाटे शरीरात गेल्यावर हॉर्मोन्सचे संतुलन बिघडवतात. ज्यामुळे स्तनांचा कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो. कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी तज्ज्ञ लोखंडी, स्टेनलेस स्टिल किंवा मातीची भांडी वापरण्याचा सल्ला दिला जातो. ही भांडी नैसर्गिक असून अन्नाचे पोषण टिकवून ठेवतात.

स्वंयपाकघरात काम करताना या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुमच्या घरातील नॉन स्टिक तव्यावर ओरखडे पडलले असतील तर तो त्वरीत बदलणं गरजेचं आहे. स्टीलमध्ये अन्न शिजवणं सर्वात सुरक्षित मानलं जातं कारण ते अन्नाशी रासायनिक प्रक्रिया करत नाही. कितीही मायक्रोव्हेव्ह सेफ असे लिहिले असले तीर प्लास्टीकच्या भांड्यात अन्न गरम करणं टाळलेलंच बरं. लोखंडी कढईत भाजी केल्यानं अन्नातील लोहाचे प्रमाण वाढते जे आरोग्यासाठी उत्तम ठरते.

English
हिंदी सारांश
Web Title : Certain kitchen utensils increase cancer risk; experts warn to discard them.

Web Summary : Non-stick, aluminum, and plastic cookware can leach harmful chemicals into food, increasing cancer risks. Experts recommend using iron, stainless steel, or earthen cookware for healthier cooking. Replace scratched non-stick pans immediately and avoid heating food in plastic.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यकर्करोगकॅन्सर जनजागृती