Join us
Daily Top 2 Weekly Top 5

नेहमीच्या खाण्यातील ५ पदार्थामुळे होतो जीवघेणा कॅन्सर; चवदार लागले तरी ताटात नकोच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:09 IST

Cancer Causing Foods : रोजच्या आहारातील कोणते पदार्थ कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात समजून घेऊ.

सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये खाण्यापिण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. चवीच्या नावाखाली लोक असे पदार्थ खातात जे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात (Cancer Causing Foods). जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांच्यामते आपल्या आहारातील काही ठराविक पदार्थ थेट कॅन्सरच्या धोक्याशी जोडलेले आहेत. जे हळहळू शरीरात टॉक्सिन्स वाढवून कॅन्सरचा धोका निर्माण करतात. रोजच्या आहारातील कोणते पदार्थ कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात समजून घेऊ. (5 Foods That Can Cause Cancer)

१) रिफाईंन शुगर आणि गोड पेय

साखर ही अधुनिक काळातील स्लो पॉयझन मानले जाते. साखरेच्या अतिसेवनानं शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे पेशींची अनियंत्रित वाढ होऊ शकते. साखरेमुळे येणारा लठ्ठपणा हा कॅन्सरचे प्रमुख कारण आहे. साखरयुक्त पेयांच्या अतिसेवनानं पॅनक्रियाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. (Ref)

२) रिफाइंड कार्बोहायड्रेट्स

मैदा तयार करताना त्यातील सर्व फायबर्स काढून टाकले जातात आणि तो पांढरा करण्यासाठी ऑलॉक्सॉन सारख्या रसायनांचा वापर केला जातो. मैद्याच्या अतिसेवनानं रक्तातील साखर अचानक वाढते. ज्यामुळे शरीरात दीर्घकालीन सूज तयार होते.

डाळीला 'या' सिक्रेट पद्धतीनं फोडणी द्या; कुकरमध्ये झटपट बनेल वरण, हॉटेलसारखी चव येईल

३) ट्रास फॅट्स

बाहेरचे तळलेले पदार्थ एकाच तेलात वारंवार तळले जातात. तेल वारंवार उकळल्यामुळे त्यात एक्रिलामाईड नावाचे घातक रसायन तयार होते. फूड एण्ड एग्रीकल्चर ऑर्गनायजेशनच्या रिपोर्टनुसार उच्च तापमानाला गरम केलेल्या पिष्टमय पदार्थांमध्ये एक्रिलामाईड तयार होते जे कार्सिनोजेनिक मानले जाते.

४) अल्ट्रा प्रोसेस्ड फूड

चिप्स, इन्संट नुडल्स, बिस्किटं आणि पॅक केलेले ज्यूस यामध्ये चव वाढवण्यासाठी कृत्रिम रंग आणि प्रिझर्व्हेटिव्हज वापरले जातात, एका अभ्यासानुसार पॅकेटमधील अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांच्या १० टक्के वाढीमुळे स्तनाचा कर्करोग आणि इतर कॅन्सरचा धोका लक्षणीयरित्या वाढतो.

लग्नसोहळ्यात उठून दिसेल खास मुनिया पैठणी; ८ आकर्षक रंगात, साडीत शाही लूक मिळेल

५) अति गरम पेय

अनेकांना वाफावळलेला चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण अति गरम पेय आपल्या अन्ननलिकेतील नाजूक आवरणाला इजा पोहोचवतात. इंटरनॅ्रशनल एजन्सी ऑन कॅन्सरनं ६५ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त गरम पेयांना प्रोबॅबल कार्सिनोजन म्हणून घोषित केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Five common foods that can cause deadly cancer: Avoid them!

Web Summary : Certain foods, like refined sugar, processed carbs, trans fats, and ultra-processed items, can elevate cancer risk. High-temperature beverages also pose a threat. Limit consumption for better health.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य