Join us

रात्री ब्रा घालून झोपल्यानं खरंच ब्रेस्ट कॅन्सर होतो का? कॅन्सर आणि ब्रा घालण्याचा काय संबंध, वाचा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 13:14 IST

Can Wearing Bra At Night At Bed Cause Brest Cancer : कित्येक महिला कॅन्सरच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे शेवटची स्टेज येते आणि जीवही गमवावा लागतो.

ब्रा(Bra) महिलांसाठी एक महत्वपूर्ण अंडरगारमेंट आहे ज्यामुळे फक्त छातीला सपोर्ट मिळत नाही तर आकारसुद्धा येतो. याशिवाय आत्मविश्वास वाढवण्यातही मदत होते. किशोरावस्थेत ब्रा घालायला सुरूवात केल्यानंतर ब्रेस्ट विकसित होणं सुरू होतं. अनेक महिलांना सवय असते की त्या दिवसरात्र ब्रा घालून ठेवतात. सोशल मीडियावर असा दावा केला जातो की रात्रभर ब्रा घातल्यानं कॅन्सर होतो. यात कितपत सत्य आहे ते समजून घेऊ. (Can Wearing Bra At Night At Bed Cause Brest Cancer Know What  Studies Says)

ब्रा आणि कॅन्सरचा संबंध कसा?

महिला रोज ब्रा घालतात कारण यामुळे स्तनांना सपोर्ट मिळतो. वेदना कमी होतात याशिवाय व्यायाम करणंही सोपं होतं. बऱ्याच महिला ब्रा घालूनच झोपतात ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. या दाव्यानुसार रात्री ब्रा घालून झोपल्यानं कॅन्सरचा धोका वाढतो कारण ब्रा लिम्फ प्रवाहात बाधा आणते. लिम्फेटिक ड्रेनेज संध होते.

कॅन्सर काऊंसिलनुसार ब्रा घालण्याचा आणि स्तनांच्या कॅन्सरचा काही संबंध नाही, याबाबत संशोधनही समोर आलेलं नाही. हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे.क्लिव्हलॅण्ड क्लिनिकचे तज्ज्ञ सांगतात रात्री ब्रा घालून झोपल्यानं संक्रमण, जळजळ अशी लक्षणं वाढू शकतात. याव्यतिरिक्त जी ब्रा खूपच घट्ट असते, त्यात अंडरवायर असते जे रक्तप्रवाह काही प्रमाणात कमी करू शकते.

स्मृती इराणींच्या घरी बनणारं 'हे' सूप प्या, हिमोग्लोबिन भरपूर मिळेल, रक्त वाढेल-थकवा दूर

ब्रेस्ट कॅन्सरमध्ये स्तनांमध्ये असामान्य पेशींची वाढ होते. स्तनांच्या पेशी नियंत्रणाबाहेर जाऊन ट्यूमरचं रूप घेतात. दर वर्षी लाखो महिला कॅन्सरमुळे आपला जीव गमावत आहेत. महिलांसोबतच पुरूषांनाही स्तनांच्या कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. स्तन कॅन्सर अनेक कारणांमुळे होतो जसं की लठ्ठपणा, जास्त तंबाखू खाणं, स्तन कॅन्सर, रिप्रोडक्टिव्ह इतिहास,

कॅन्सरची लक्षणं

कित्येक महिला कॅन्सरच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे शेवटची स्टेज येते आणि जीवही गमवावा लागतो. सुरूवातीलाच या लक्षणांना ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास गंभीर स्थिती टाळता येते. त्वचेतील बदल कोरडी त्वचा एक्जिमा, निपल्समधून स्त्राव येणं, डिंपलिंग, स्तन किंवा निपल्स दुखणं, सूज येणं अशी लक्षणं उद्भवतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल